अनाथ व निर्धार मुलांना मिळणार आता कुटुंबाचे प्रेम व आधार; बालकांच्या संगोपणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

अहमदनगर : अनाथ व निर्धार मुलांना कुटुंबाचे प्रेम व आधार मिळावा म्हणून राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने प्रतिपालकत्व ही योजना जाहीर केली आहे. यातून जिल्ह्यातील ४० बालकांची निवड करुन इच्छुक पालकांना ही मुले सांभाळण्यासाठी दिली जाणार आहेत. यासाठी सरकार अनुदानही देणार आहे.

महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग अनाथ व निराधार मुलांना आधार देण्यासाठी विविध योजना आणत आहे. त्याच भाग म्हणून आता अनाथ व निराधार मुलांना कुटुंबाचे प्रेम, आधार वात्सल्य मिळावे म्हणून प्रतिपालकत्व ही योजना जाहीर केली आहे. ही योजना सोलापुर, पुणे, पालघर, मुंबई उपनगर व अमरावती या जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविली जाणार आहे.

प्रतिपालकत्व योजनेत अनाथ व निराधार बालकांना कुटुंब मिळविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बालकांचा सर्वांगीण विकास व बालकांची हित कुटुंबात आहे. म्हणूनच अनाथ व निराधार बालकांना कुटुंब मिळवून देण्यासाठी महिला व बालविकास विभाग प्रयत्न करत आहे.  या योजनेअंतर्गत कुटुंबांना अनाथ व निराधार बालकांना तात्पुरत्या स्वरूपात सांभाळ करता येणार आहे. बालकांचे पालकत्व स्वीकारलेल्या कुटुंबांना बालकांचा संगोपनासाठी महिन्याला दोन हजार रूपये सरकारकडून दिले जाणार आहेत. 

प्रतिपालकत्व योजनेसाठी प्रत्येक जिल्ह्यातून फक्त ४० बालकांची निवड केली जाणार आहे. मुलांची काळजी व सर्वेक्षण अधिनियम 2015 च्या कलम 44 नुसार प्रतिपालकत्व योजनेची तरतूद केली आहे. इच्छुक कुटुंबांनी www.wcdcommpune.oge या संकेतस्थळावर अर्ज करावेत असे आवाहन महिला व बालविकास विभागाने केले आहे.

सोलापूर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. विजय खोमणे म्हणाले, प्रतिपालकत्व योजनेसाठी प्रत्येक जिल्ह्यातून फक्त ४० बालकांची निवड केली जाणार आहे. मुलांची काळजी व सर्वेक्षण अधिनियम 2015 च्या कलम 44 नुसार प्रतिपालकत्व योजनेची तरतूद केली आहे. इच्छुक कुटुंबांनी अर्ज करावेत.

Leave a Reply

Your email address will not be published.