आजी येताच आजोबांनी डान्स थांबवून ठोकली धूम; पोट धरून हसायला लावणारा VIDEO

पुणे – सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. एका व्हिडिओमुळे रातोरात स्टार झालेल्यांची उदाहरणेही देशात आहेत. यामध्ये रानू मंडल, बाबा का ढाबा वाले बाबा यांची उदाहरणे अलिकडची म्हणून देता येतील. याशिवाय असे काही व्हिडिओ व्हायरल होतात त्यात तो कोणत्या ठिकाणचा आहे, त्यात कोण आहे याच्याशी काही देणं घेणं नसतं. सध्याही असाच एक आजोबांच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

विनोद म्हणून का होईना पण नवरा बायकोला घाबरतो हे सांगण्यासाठी अनेक व्हिडिओ, मीम शेअर केले जातात. त्यात हा आजी आजोबांचा व्हिडिओ फॉरवर्ड होत आहे. आजीचा दरारा इतका आहे की नुसती चाहूल लागताच नाचण्यात दंग झालेले आजोबा तर्राट पळत सुटतात. 

कोणत्यातरी कार्यक्रमामध्ये आजोबा डान्स करताना दिसतात. आजोबा दारु पिऊन नाचत असल्यासारखं दिसतं. डान्स ऐन रंगात आलेला असताना व्हिडिओच्या शेवटी आजोबा पळ काढताना दिसतात. तेव्हा मागून आजी हातात काठी घेऊन येताना दिसते. प्रचंड व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ वेगवेगळ्या कॅप्शनसह शेअर केला जात आहे. याला म्हणतात आजीचा दरारा असं म्हणत व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

Web Title: viral video ajoba dance ran after wife coming

<!–

–>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *