आत्महत्येच्या घटनांत महाराष्ट्र प्रथम 

मुंबई – आत्महत्यांच्या घटनांत महाराष्ट्र गेल्या वर्षी (२०१९) पहिल्या क्रमांकावर राहिले आहे. सलग तीन वर्षे हे प्रमाण कमी होत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे.  देशातून एकूण घटनांच्या १३.६ एवढे हे प्रमाण आहे. त्यानंतर तमिळनाडूचा क्रमांक आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागा(एनसीआरबी) ने यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतही याबाबत चिंताजनक स्थिती आहे. 

– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या ‘एनसीआरबी’ने भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्या २०१९ हा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. त्यामध्ये देशभरातील राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांतील एकूण मृत्यूचे विश्‍लेषण केले आहे. यामध्ये आजारपण, गरिबी आणि बेरोजगारीमुळे आत्महत्या करणाऱ्यांची माहिती दिली आहे.

– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुंबईत प्रमाण वाढले
मुंबईत प्रमाण ४.७ टक्‍क्‍यांनी वाढले २०१८ या वर्षाच्या तुलनेत राज्यात आत्महत्यांचे प्रमाण ५.३ ने वाढून १५.४ टक्के झाले आहे. गेल्या वर्षी मुंबईत १ हजार २२९ आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्याआधी २०१८ मध्ये मुंबईत १ हजार १७४ आत्महत्यांची नोंद झाली होती. चेन्नई २ हजार ४६१, दिल्लीत  २ हजार ४२३, बंगळूर येथे २ हजार ८१ एवढ्या आत्महत्या झाल्या. देशातील ५३ शहरांतील आत्महत्येचे एकूण प्रमाण हे ३६.६ टक्के आहे

Edited By – Prashant Patil

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *