आनंदाची बातमी! सोलापूर मध्यवर्ती कारागृहातील 60 कैदी झाले कोरोनामुक्‍त 

सोलापूर : संपूर्ण राज्यभर कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असतानाच बरे होणाऱ्या रुग्णांचा दरही वाढू लागला आहे. मध्यवर्ती कारागृहातील तब्बल 60 कैद्यांना कोरोना झाल्याचा धक्‍कादायक प्रकार राज्यात प्रथम सोलापुरात झाला होता. कोणतीही लक्षणे नसतानाही कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आणि सर्वांना धक्‍काच बसला. आता 14 दिवसांच्या उपचारानंतर सर्व कैदी बरे होऊन पुन्हा कारागृहात दाखल झाले आहेत. 

सोलापुरातील कोरोनाचा संसर्ग अद्याप कमी झालेला नसून दररोज कमी-अधिक प्रमाणात रुग्ण सापडू लागले आहेत. कोरोनाला हद्दपार करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करुनही त्याचा विळखा कमी झालेला नाही. समाधानकारक बाब म्हणजे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढत असून त्यासाठी डॉक्‍टरांची मेहनत मोठी आहे. मात्र, नागरिक विनाकारण घराबाहेर पडू लागले असून दररोज भाजीपाला तथा घरगुती वस्तू खरेदीसाठी बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. सोलापुकरांनी कोरोनाचा संसर्ग खंडीत करण्यासाठी लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्‍यक आहे, असेही श्री. इगवे म्हणाले. दरम्यान, संपूर्ण कारागृह आता कोरोनामुक्‍त झाले असून तुरुंगातील 13 कर्मचारीही यापूर्वीच बरे झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

कोरोनामुक्‍त झालेल्या कैद्यांची स्वतंत्र सोय 
सोलापूर मध्यवर्ती कारागृहातील 60 कैद्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासन आवाक झाले होते. तर तुरूंग प्रशासनही हादरले होते. कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांची सोय शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात करण्यात आली होती. त्यातील बहूतांश कैद्यांना काहीच लक्षणे नव्हती, परंतु त्यांच्यावर नियिमत उपचार सुरु होते. 14 दिवसानंतर आता संपूर्ण कैदी कोरोनामुक्‍त झाले असून शनिवारी (ता. 20) त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. त्यांच्या राहण्याची सोय स्वतंत्रपणे करण्यात आली आहे. 
दिगंबर इगवे, तुरूंग अधिक्षक, सोलापूर मध्यवर्ती कारागृह 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

Web Title: Kovid-19 positive 60 inmates of Solapur Central Jail became healthy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *