आनदाची बातमी; चार दिवसात उजनी धरण येणार “प्लस’मध्ये 

सोलापूर ः उजनी धरणाच्या परिसरात या नक्षत्रातही चांगला पाऊस पडत आहे. त्याचबरोबर दौंड येथून धरणात जवळपास साडेचार हजार क्‍युसेकने पाणी येत आहे. त्यामुळे पुढील तीन-चार दिवसात धरण “प्लस’मध्ये येण्याची शक्‍यता लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

उजनी धरणाकडे सोलापूरसह पुणे व नगर या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते. यंदाच्या वर्षी चांगला पाऊस असल्याने धरण लवकरच भरण्याची आशा शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. मृग नक्षत्राबरोबरच आता सुरु असलेल्या पुनर्वसू नक्षत्रातही चांगला पाऊस होत असल्याने धरणाच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. 16 जूनला धरणात वजा 23 टक्के इतका पाणीसाठा होता. त्यामध्ये आता वाढ झाली आहे. धरण परिसरात पाऊस होत असल्याने पाणीपातळीच्या वाढीस मदत होत आहे. दौंड येथून धरणात येणारे पाणी कमी जास्त होत आहे. सकाळी चार हजार 693 क्‍सुसेकने पाणी येत होते. त्यामध्ये सायंकाळी सहा वाजता किंचीतशी घट झाली. धरणात येणाऱ्या पाण्याची स्थिती हीच राहिली तर पुढील तीन-चार दिवसांमध्ये धरण “प्लस’मध्ये येण्याची शक्‍यता असल्याचे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी “सकाळ’ला सांगितले. 

 
 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

Web Title: Good news; In four days Ujani dam will come in “plus”

<!–

–>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *