एकनाथ खडसेंचं पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन म्हणजे जेलमध्ये जाण्याचा सराव; भाजप आमदाराचा टोला

MLA Mangesh Chavan On Eknath Khadse:  राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या आंदोलनावरुन भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी हल्लाबोल केला आहे. खडसेंचं पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन म्हणजे जेलमध्ये जाण्याचा सराव आहे, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे.  जिल्हा दूध संघ अपहार प्रकरणात एकनाथ खडसे परिवारासह मोठ्या टोळीचा समावेश आहे. या टोळीचे प्रमुख एकनाथ खडसे आहेत, असं आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटलं आहे.
 
जिल्हा दूध संघ प्रकरणात भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहे. जिल्हा दूध संघाच्या अपार प्रकरणात मोठी टोळी सक्रिय असून त्या टोळीचे प्रमुख एकनाथ खडसेच असल्याचा आरोप मंगेश चव्हाण यांनी केला आहे.

जिल्हा दूध संघात एक ते दीड कोटी रुपयांची चोरी झाल्याचा आरोप करत गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी एकनाथ खडसे यांनी शहर पोलीस ठाण्यात तब्बल नऊ ते दहा तास ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनावर  आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांना टोला लगावला आहे. 

दूध संघाच्या प्रकरणात मी सुरुवातीला जी तक्रार दिली आहे. ज्यांच्याविरुद्ध माझी तक्रार आहे तेच आंदोलन करतात आणि तेच पोलिसात फिर्याद देतात. या आश्चर्यकारक बाब असून एकनाथ खडसे आता बाहेर आहेत. मात्र ते जेलमध्ये जाण्याचा सराव करत असल्याचा टोला आमदार मंगेश चव्हाण यांनी लगावला आहे.

तब्बल आठ तासांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी घेतली खडसेंची तक्रार

एकनाथ खडसेंच्या तब्बल आठ तासांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी तक्रार घेतली होती. दूध संघात अपहार नव्हे तर दूध संघात चोरी झाल्याची माहिती एकनाथ खडसेंनी दिली होती.   जिल्हा दूध संघात एक ते दीड कोटी अपहार झाल्याचा आरोप करत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी एकनाथ खडसे यांच शहर पेालीस ठाण्यात आंदोलन सुरु होते. मात्र, पोलिसांकडून कुठलीही तक्रार अथवा गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. पोलीस याप्रकरणात कुठलीही नोंद घेत नसल्याने यावेळी एकनाथ खडसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा चांगलाच संताप झाला होता. तब्बल आठ उलटल्यानंतर अखेर याप्रकरणात पोलिसांनी दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांची फिर्याद घेतली. तर दुसरीकडे दूध संघात अपहार झाला आहे, असे आंदोलन सुरु झाल्यापासून सांगणाऱ्या एकनाथ खडसेंनी युटर्न घेत आता याप्रकरणात अपहार नव्हे तर चोरी झाल्याचे सांगितले होते. दरम्यान खडसेंच्या आंदोलनामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. 

जिल्हा दूध संघांत मालाच्या तपासणीत दूध संघातून 14 टन 80 लाखांचे पांढरे लोणी बाहेरच्या जिल्ह्यात पाठवण्याचे भासवण्यात आलं आहे. प्रत्यक्षात माल बाहेर गेल्याबद्दलच्या नोंदी आढळून आलेल्या नाही. तर दूधाच्या पावडरच्या साठ्यात 30 ते 35 लाख रुपये किंमतीच्या 360 बॅगची तफावत आढळून आली आहे. असे एकंदरीत 1 कोटी 15 लाख रुपयांच्या मालाची चोरी झाल्याचे तपासणीतून समोर आले असून संबंधित माल हा दूध संघातील अधिकाऱ्यांच्या मदतीने इतरांनी चोरी केल्याचे दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे. या तक्रारीनुसार संशयित आरोपी कर्मचाऱ्यांवर चोरीचा गुन्हा दाखल करावा असे लिमये यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *