एकेकाळी मुंबईत ‘भिकू’ नावाने गँगस्टर होता; आज ‘तो’ आहे प्रसिद्ध धावपटू!

नाशिक : एक गॅंगस्टर म्हटला तर आपल्या डोक्यात नेहमी बंदूक हातात घेऊन धमकी देणारा डॉनच येतो. अशी अनेक उदाहरणे आहेत की, कारागृहात राहून स्वत;मध्ये बदल निर्माण करणारे अट्टल गुन्हेगारही आपण पाहिले असतील. ज्यांनी आज चांगले व्यक्तीमत्व निर्माण केले आहेत. पण तुम्हाला माहित आहे का? असा एक गँगस्टर होता. जो आज मॅरेथॉनचा प्रसिध्द धावपटू आहे. कदाचित आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. मनाचा निश्चय पक्का असेल तर माणूस आपल्या आयुष्यात अमुलाग्र बदल निर्माण करू शकतो. त्याचेच मुर्तिमंत उदाहरण म्हणजे राहूल जाधव…

एकेकाळी होता गँगस्टर; आज मॅरेथॉनचा धावपटू 

वर्ष २००७ मध्ये मकोका गुन्ह्यासह डझनभर गुन्हे दाखल असणारे गॅंगस्टर राहुल जाधव…. याच काळात शहीद पोलीस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळस्कर यांनी राहुल जाधव यांना अटक केली. त्यावेळेस पोलिसांच्या गोळीपासून राहुल जाधव वाचले.. आणि वर्ष २०१० मध्ये राहुल जाधव जामिनावर बाहेर आले. त्यावेळी त्यांनी ३ वर्षे ऑर्थर रोड तुरुंगात काढली. त्यावेळी विविध खटले त्यांच्यावर चालले. पण खरी सुरूवात त्यांची इथून पुढे झाली. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांना एका कंपनीत नोकरी मिळाली. पण नशिब पुन्हा फिरलं आणि एक दिवस अचानक पोलिसांनी पत्रकार जेडे हत्या प्रकरणी राहुल जाधव यांच्यासह अनेक नामाकिंत गुन्हेगारांना ताब्यात घेतलं.

मनाचा निश्चय पक्का असेल तर काहीही शक्य

पण मनाचा निश्चय पक्का असेल तर माणूस आपल्या आयुष्यात अमुलाग्र बदल निर्माण करू शकतो. राहुल जाधव यांनी आपला भुतकाळ मागे सारत उंच झेप घेतली आहे. ते आता सध्या मॅरेथॉनचे प्रसिध्द धावपटू आहेत. गेली १९ वर्ष ते सतत धावत आहेत. त्यांच्या आय़ुष्यातील १० वर्षे पोलिसांपासून तर गेली ९ वर्षे ते मॅरेथॉनमध्ये धावत आहेत. ४३ वर्षीय राहुल जाधव यांना आता टाटा मुंबई मॅरेथॉनचंही तिकीट मिळालं असून याची जोरदार तयारी सुरू आहे. राहुल जाधव सध्या पुण्यात स्थायिक आहेत. मुंबई मॅरेथॉनचा पास मिळवण्यासाठी ते बीकेसीमध्ये दाखल झाले. २०१६ पासून मुंबई मॅरेथॉनचं हे त्यांचं चौथं वर्ष असल्याचं राहुल यांनी सांगितलं.

हेही वाचा – रूम नंबर १०५ चे गुढ कायम; मुंबई-नाशिक हायवेवरील हॉटेलमधील घटना

सध्या मॅरेथॉन हाच जीवनाचा ध्यास

शालेय जीवनात खेळाची आवड असणारे राहुल मूळचे ठाण्याचे रहिवासी होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच… त्यांच्या परिवारात ते सर्वात मोठे असून त्यांच्यामागे तीन बहिण- भाऊ होते. वडील एका खासगी कंपनीत नोकरी करत होते आणि त्यातून जे काही मिळत होतं, त्यात फक्त घर चालायचे. बहिणीच्या लग्नासाठीही पैसे वाचवायचे होते. आणि हीच परिस्थिती त्यांना गुन्हेगारीकडे घेऊन गेली. सध्या मॅरेथॉन हाच जीवनाचा ध्यास बनला असं ते आवर्जून सांगतात.

हेही वाचा – सटाण्यात लहान मुले सातच्या आत घरात! रात्रीच्या विचित्र प्रकाराने दहशत; युवकांचा जागता पहारा

Leave a Reply

Your email address will not be published.