एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2020 | रविवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

  1. पुन्हा नवी सुरुवात : पाचव्या लॉकडाऊनसाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर, राज्यांतर्गत प्रवासावरील निर्बंध कायम, मॉल, हॉटेल अन् मंदिरेही बंदच तर, 5 जूनपासून सम-विषम पद्धतीनं दुकानं उघडण्यास परवानगी https://bit.ly/3cpUFvi

 

  1. शाळांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण विभागाची बैठक, जूनपासूनच शिक्षण सुरू करण्याची व्यवस्था https://bit.ly/3eDb1lo

 

  1. उद्यापासून पेट्रोल-डिझेल 2 रुपयांनी महागणार, कोरोनामुळं रिकामी झालेली तिजोरी भरण्यासाठी इंधनावर अधिभार लावण्याचा राज्य सरकारचा निर्णय https://bit.ly/3dlDmwn

 

  1. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका गरीब, श्रमिकांना. त्यांना प्रचंड वेदना भोगाव्या लागत आहे; मन की बात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशवासियांशी संवाद https://bit.ly/2Xix6Qz

 

  1. मन की बातमध्ये पंतप्रधान मोदी यांच्याकडून नाशिकचे शेतकरी राजेंद्र जाधव यांचं कौतुक, ट्रॅक्टरवरील सॅनिटायझेशन मशिनचा उल्लेख https://bit.ly/3djknTt

 

  1. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं चक्रीवादळाची शक्यता, मासेमारीसाठी गेलेल्या सर्व 455 मासेमारी बोटींना मत्स्यव्यवसाय विभागाने संदेश पाठवून बोलवले माघारी https://bit.ly/3gDMhvo

 

  1. कोल्हापूर, सातारा, पुणे, पिंपरी चिंचवड, हिंगोली, बेळगावमध्ये पावसाच्या सरी; 3 ते 4 जूनला महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ मान्सून येण्याचा अंदाज https://bit.ly/2yNsubG

 

  1. टोळधाडीचं नागपुरात पुन्हा आक्रमण, हजारो एकर शेतीचे नुकसान; गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून पाहणी https://bit.ly/2TTgPQ7

 

  1. देशात गेल्या 24 तासात सर्वाधिक 8 हजार 380 कोरोना रुग्णांची वाढ, आतापर्यंत 5164 रुग्णांचा मृत्यू, 86,983 कोरोनामुक्त; तर, कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 82 हजार 143 वर https://bit.ly/3gG9yNl

 

  1. जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 61 लाखांच्या वर, 27 लाखांहून अधिक रुग्ण झाले बरे तर, 24 तासात 4,454 जणांचा बळी https://bit.ly/2Xikitz

 

BLOG | शिथिलतेच्या मार्गावर काटे अनेक, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2XPwIIg

युट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप –  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE – https://goo.gl/enxBR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *