कंदहार विमान अपहरणप्रकरणी १९ जणांची सुटका कायम

मुंबई – १९९९ मध्ये कंदहार विमान अपहरण प्रकरणात जिल्हा दंडाधिकारी न्यायालयाने दिलेला १९ आरोपींची सुटका करण्याचा निर्णय सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे. 

– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अभियोग पक्षाने आरोपींचा या प्रकरणातील सहभाग पुरेशा सबळ पुराव्यानिशी सिद्ध करू शकले नाहीत, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. केवळ तीनशे ते अडीच हजार रुपये लाच मिळण्यासाठी त्यांनी पारपत्राची कागदपत्रे पाहणी न करताच पुढे सरकावली होती, मात्र या कटाची माहिती त्यांना नव्हती, असा दावा आरोपींच्या वतीने करण्यात आला होता. यामध्ये पारपत्र एजंट, कर्मचारी, पोस्टमन आदींचा आरोपीमध्ये समावेश आहे.

– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

२०१२ मध्ये जिल्हा दंडाधिकारी न्यायालयाने आरोपी अब्दुल लतीफ मोमीनसह १९ आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. अभियोग पक्षाने २८ साक्षीदारांचा जबाब नोंदविला होता. मात्र हा पुरावा आरोपींविरोधात सबळ नाही, असे निरीक्षण दंडाधिकारी न्यायालयाने नोंदविले आहे. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सत्र न्यायालयात अपील केले होते. पोलिसांनी एकूण २३ जणांना अटक केली होती. यापैकी काहींचा मृत्यू झाला आहे; तर काहींची याआधी निर्दोष मुक्तता केली आहे.

Edited By – Prashant Patil

Leave a Reply

Your email address will not be published.