कर्मचाऱ्यांनो, दिवाळीमध्ये वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी व्हा सज्ज 

सोलापूर ः दिवाळी सणामध्ये सर्व वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत राहील, यासाठी सज्ज राहण्यासोबतच वीजपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करून ठेवावी. यासोबतच नवीन वीजजोडणीच्या कामांना वेग देऊन पेडपेडींग असणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील वीजजोडण्या दिवाळीपूर्वी कार्यान्वित करण्याचे निर्देश महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत. नागरिकांनी सार्वजनिक वीजयंत्रणा आणि घरगुती विद्युत उपकरणांपासून सुरक्षितपणे दिवाळी साजरी करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 

पुणे प्रादेशिक विभागातील अधिकाऱ्यांसोबत नुकतीच त्यांची व्हीडीओ कॉंन्फरसिंगद्वारे बैठक झाली. यामध्ये दिवाळीच्या कालावधीत वीजपुरवठा सुरळीत राहील यासाठी पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अभियंता व कर्मचाऱ्यांनी सज्ज व सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. महावितरणची विजयंत्रणा ही सार्वजनिक ठिकाणी आहे. यात उच्च व लघुदाबाच्या उपरी वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आदी यंत्रणा उघड्यावर असल्याने फटाके फोडताना त्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे. फटाक्‍यांच्या आतषबाजीत सार्वजनिक वीजयंत्रणेला आगीचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. रोहित्र, फ्यूज पेट्या, फिडर पिलर, रिंग मेन युनिटजवळ फटाके फोडू नयेत किंवा त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये अथवा तो जाळू नये. वीजवाहिन्यांना स्पर्श होईल किंवा धोका निर्माण होईल असे रॉकेटसारखे फटाके वाहिन्यांखाली उडवू नयेत. मोकळ्या जागेतच फटाके उडवावेत. वीजयंत्रणेला आग लागल्यास, धोका निर्माण झाल्यास, वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या 24 तास सुरु असणाऱ्या कॉल सेंटरच्या 18001023435 किंवा 18002333435 किंवा 1912 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनी त्यांनी केले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

Web Title: Employees, get ready to maintain power supply in Diwali

<!–

–>

Leave a Reply

Your email address will not be published.