‘काही दिवसात जयंत पाटलांच्या घरासह बारामती-मुंबईमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर भाजपचा झेंडा असेल’ : गोपीचंद पडळकर

Gopichand Padalkar on NCP At Sangli: भाजप आमदार (BJP MLC Gopichand Padalkar) यांनी पुन्हा राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे.  येत्या काही दिवसात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरावर भाजपचा झेंडा लागलेला असेल. त्यानंतर बारामती, मुंबईमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या वर सुद्धा भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकलेला असेल, असं वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. 

काही दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेस विसर्जित करून 90 टक्के लोक भाजपमध्ये येतील, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले.  सांगली जिल्ह्यातील उटगी येथील सभेत गोपीचंद पडळकर बोलत होते.

पडळकर म्हणाले की, भाजपचा झेंडा राष्ट्रवादीच्या काही कार्यालयात लागला आहे. हा झेंडा काही दिवसांनी प्रदेशाध्यक्षांच्या घरावर लागलेला असेल. हे मी जबाबदारीने बोलतोय. 

आमच्यासारखे छोटे छोटे कार्यकर्ते फिरले तरी राष्ट्रवादीच्या कार्यालयांवर भाजपचे झेंडे लागत आहेत. मागील आठ-दहा दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की, माझे बाबा जर राज्यभर फिरले तर पुन्हा आमची सत्ता येईल. पडळकर म्हणाले की, आता त्यांना कार्यकर्त्यांना विचारावं लागेल की आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस विसर्जित करावं लागणार आहे तर आपण काँग्रेसमध्ये जायचं की भाजपमध्ये. मग त्यांच्यात वाद तयार होईल आणि बहुमताने लोक म्हणतील की भाजपमध्येच जाऊयात, ही परिस्थिती पुढे येणार आहे, असं पडळकरांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *