कृषीसाठी ठोस धोरण निश्‍चित करा – पवार

मुंबई – लॉकडाउनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला कृषी व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे त्वरित कृषीविषयक ठोस धोरण जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ११ कलमी कृती योजना जाहीर करून, शेतकऱ्यांना अधिक परतावा मिळण्याची हमी दिली. २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजचाच तो भाग होता, ही बाब शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या निदर्शनास आणून दिली.

राज्यात उन्हाचा चटका वाढणार; कोकण,मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस शक्य

शेतकऱ्यांचे एपीएमसी अर्थात कृषी उत्पन्न बाजार समितीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ठराव करणे आणि सल्लामसलत करणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्यासाठी संबंधित राज्य सरकारच्या सहकार व पणन मंत्र्यांशी सल्लामसलत करून विशिष्ट मार्गदर्शक सूचना कराव्यात, असे शरद पवार यांनी सूचित केले आहे.

पवार यांनी पत्रात काय म्हटलंय?
शेतीसाठी १.६३ लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत ही एकूण आर्थिक पॅकेजच्या फक्त आठ टक्के आहे. शेतकऱ्यांना नफा मिळण्याच्या दृष्टीने अन्नधान्यावर प्रक्रिया करण्यासाठी तसेच निर्यातदारांसाठी अन्नधान्य साठा मर्यादा काढली आहे; निव्वळ नफा जोडून उत्पादनांच्या किमतीच्या आधारावर अन्नधान्याच्या किमती निश्‍चित कराव्यात.

Leave a Reply

Your email address will not be published.