केंद्र सरकारचे कृषी आणि कामगार कायदे केवळ मूठभर उद्योगपतींसाठी; कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची टीका

सांगली : देशातील भाजप सरकार लोकशाही मारण्याचे पाप करत आहे, अशी टीका कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केली आहे. तसेच भाजपचे हुकूमशाही सरकार आम्ही आता जास्त काळ टिकू देणार नाही, असा इशाराही यावेळी मंत्री कदम यांनी दिला आहे. केंद्राच्या कृषी आणि कामगार विधेयक कायदा विरोधात करण्यात आलेल्या सांगलीतील आंदोलनावेळी ते बोलत होते. कामगार कायद्यामुळे उद्योगपतींना अधिकच फायदा होणार आहे. त्यामुळे कामगारांची ही गळचेपी आहे. तसेच केंद्र सरकारचे कृषी आणि कामगार कायदे हे केवळ मूठभर उद्योगपतींच्यासाठी असल्याची टीका करत केंद्रातल्या भाजप सरकार लोकशाहीला मारण्याचे पाप करत आहे, असा आरोपही मंत्री विश्वजित कदम म्हणाले.

केंद्र सरकारच्या कृषी कामगार विधेयक कायद्याच्या विरोधात काँग्रेसकडून आज देशभर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. दोन ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्ताने देशात काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. सांगलीमध्येही कृषिराज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समिती समोर हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मंत्री विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कृषी आणि कामगार विधेयकाचा निषेध नोंदवत कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हाथरस प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल करुन मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावं : प्रताप सरनाईक

सांगलीत करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये स्वभिमानी शेतकरी संघटना याचा विविध शेतकरी संघटना त्याबरोबर कामगार संघटना आणि सहभागी झाल्या होत्या. तसेच आंदोलनास काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्यासह काँग्रेस नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

कृषी विधेयक शेतकऱ्यांसाठी जाचक : कदम

केंद्र सरकारचे कृषी विधेयक शेतकऱ्यांसाठी जाचक आहे, या विधेयकामुळे शेतकऱ्यांची लूट होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पंखे छाटली जाणार आहेत तर कामगार कायद्यामुळे उद्योगपतींना अधिकच फायदा होणार आहे. कामगारांची ही गळचेपी आहे. तसेच केंद्र सरकारचे कृषी आणि कामगार कायदे हे केवळ मूठभर उद्योगपतींसाठी असल्याची टीका करत भाजप सरकार लोकशाहीला मारण्याचे पाप करत आहे, असा आरोपही मंत्री विश्वजित कदम यांनी यावेळी केला आहे. त्याचबरोबर हे हुकूमशाही सरकार आम्ही टिकू देणार नाही, असा इशाराही मंत्री विश्वजीत कदम यांनी यावेळी दिला आहे.

Congress Agitation | राहुल गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुक्की; राज्यभर ठिकठिकाणी काँग्रेसची आंदोलनं

Leave a Reply

Your email address will not be published.