"कॉंग्रेस समर्थकांकडून धोका" तुषार भोसलेंची सायबर पोलिसांत तक्रार 

नाशिक : देवस्थानचे सोने ताब्यात घेण्याच्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याला केलेल्या विरोधावरून चर्चेत आलेले आचार्य तुषार भोसले यांनी नाशिक सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली. माझी आध्यात्मिक भूमिका कॉंग्रेसच्या काही व्यक्तींना जिव्हारी लागल्याने त्यांच्याकडून आपल्याला धोका असल्याचे तुषार भोसले यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

नाव अन् जातीवरून बदनामी..भोसलेंचा आरोप
पृथ्वीराज चव्हाण यांनी “देवस्थानांचे सोने ताबडतोब ताब्यात घ्या’, असे गेल्या 13 मेस म्हटले होते. चव्हाण यांच्या मागणीचा निषेध जिव्हारी लागल्याने कॉंग्रेसचे काही नेते वा समर्थकांनी माझे नाव आणि जातीवरून बदनामी चालविली असल्याचा आरोप भोसले यांचा आहे. त्यांच्या तक्रारीनुसार माझे नाव तुषार शालिग्राम भोसले असूनही सोशल मीडियावर माझे खरे नाव आचार्य तुषार भोसले नसून, तुषार शालिग्राम पितांबर असे आहे व हा बहुजन नसून ब्राह्मण आहे, असा अपप्रचार करीत माझ्या मराठा समाजाचा तसेच ब्राह्मण अशा “मराठा” आणि “ब्राह्मण’ या जातींचा उल्लेख करून दोन्हीही समाजाचा अवमान करून दोन्ही समाजात सोशल मीडियातून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

हेही वाचा > संशोधकांना सुखद धक्का! काळाराम मंदिरासमोर खोदकामात ‘हे’ काय आढळले?

सोशल मीडियावर धमकी 
फेसबुकवर चेतन पाटील, विशाल पवार, संदीप चव्हाण, धीरज जगताप, प्रसाद सावंत, मिलिंद गायकवाड, अमोल मिटकरी, रविकांत मेश्राम, शेखर सोनलकर आदींच्या अकाउंटवरून माझ्याविषयी अपप्रचार सुरू आहे. तसेच माझ्याविरोधात तक्रार दाखल करून “तो’ गुन्हा नोंदवल्याची खोटी माहिती आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा फोटो व्हायरल करून माझी बदनामी सुरू आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक समर्थक, कार्यकर्ते सोशल मीडियामध्ये माझा बदला घेण्याची भाषा करीत असल्याने माझ्या जिवाला धोका आहे. माझ्यावर आणि माझ्या कुटुंबदयांवर हल्ला करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असेही तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा >  GOOD NEWS : येवला, दाभाडी, ओझरच्या भाळी कोरोनामुक्तीचा टिळा! ‘हा’ तालुकाही कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर 

Leave a Reply

Your email address will not be published.