कोरोग्रस्तांसाठी १०८ रुग्णवाहिका ठरली जीवनवाहिनी; ‘एवढ्या’ रुग्णांना दिली राज्यात सेवा

जगभरात करोनाची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये महाराष्ट्रात जीवनदायिनी म्हणून नावारुपास आलेली १०८ रुग्णवाहिका करोना रुग्णांना सेवा देत आहे.  राज्यात १०९ या ९३७ रुग्णवाहिका आहेत. त्यात कोविड 19 मध्ये करोनाग्रस्त रुग्णांना सेवा देण्यासाठी ३१८ रुग्णवाहिंकांचा वापर होत आहे. त्यात ६६ रुग्णवाहिका मुंबईच्या सेवेत आहेत. अशावेळी करोनाच्या संशयितांची तपासणी करण्यासाठी तसेच संशयितांबरोबर करोनाग्रस्तांना क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या सर्वांना ने आण करण्यासाठी १०८ रुग्णवाहिकांची सेवा उपयुक्त ठरत आहे. महाराष्ट्र इर्मजन्सी मेडिकल सव्हिर्सेस यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२० पासून ते ३० मे २०२० पर्यंत ७१ हजार ९५३ रुग्णांना रुग्णवाहिकेतून सेवा देण्यात आली आहे.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्रात नागरिकांच्या सेवेसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘महाराष्ट्र इर्मजन्सी मेडिकल सव्हिर्सेस’ (एम.ई.एम.एस.) २६ जानेवारी २०१४ ला १०८ रुग्णवाहिका ही लॉन्च केली. २०१४ पासून ३० मे २०२० पर्यंत या रुगणवाहीने ४८ लाख रुग्णांना सेवा दिली आहे. सर्वत्र करोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. आरोग्यसेवा क्षेत्रासाठी अतिशय गंभीर काळ सुरु आहे. करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना करोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी १०८ क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर अवघ्या काळी वेळात रुग्णवाहिकाची सुविधा उपलब्ध होत आहे. सध्या करोना महामारीचे संकट देशभर थैंमान घातले आहे. अशा परिस्थितीत सर्वत्र रुग्णांच्या संख्येत वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे. यावेळी रुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळणे अत्यंत गरजेचे असते.
१०८ कट्रोंल रुमचे मॅनेजर डॉ. प्रवीण साढळे म्हणाले, महाराष्ट्रात २०१४ पासून ते आतापर्यंत एकूण ४८ लाख रुग्णांना रुग्णवाहिकेतून सेवा देण्यात आली आहे. सध्या जगभर करोना व्हायरसने थैमान घातले आहे. अशातच ज्या रुग्णांना करोनाची बाधा झाली आहे. अशा सर्व करोनाग्रस्त रुग्णांना रुग्णवाहिकांमधून सेवा दिली जात आहे. खास कोविड 19 साठी ३१८ रुग्णवाहिकांचा वापर सुरु आहे. आम्ही सर्व रुग्णांची व्यवस्थित काळजी घेवून सेवा देत आहोत. जर आणखीन रुग्णवाहिकांची गरज भासल्यास आणखीन रुग्णवाहिकांची सेवा बजावणार आहोत. 

काही वेळेस उद्भवतीय अडचण
रुग्णांना तातडीने सुविधा मिळण्यासाठी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा सुरु करण्यात आहे.  यावेळी प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी १०८ क्रमांकावर शुक्रवारी सकाळी ११.१० मिनीटे, ११.१२ मिनीटे, ११.१७ मिनीटे यावेळी संपर्क केल्यास तात्काळ संपर्कच होवू शकला नाही. त्यानंतरच बऱ्याच अवधीनंतर संपर्क झाला. अशावेळी केवळ १०८ क्रमांकाचा टोल फ्री नंबर उपलब्ध होत नसेल तर १०८ रुग्णवाहिकेचा संपर्क असूनही खोळंबा होत असल्याची परिस्थिती दिसून येत आहे.

कोणत्या जिल्ह्यांमध्ये ३० मे २०२० पर्यंत किती रुग्णांना दिली सेवा (कंसात रुग्णांची संख्या)
मुंबई १६,९६८, अहमदनगर २,१५२, अकोला १,८०८, अमरावती २,८७१, औरंगाबाद १,४४०, बीड ८९१, भंडारा १,१२४, बुलढाणा १,२९४, चंद्रपूर २,५०३, धुळे ८७५, गडचिरोली ५२८, गोंदिया १,०३३, हिंगोली १,००२, जळगाव १,५११, जालना १,१०९, कोल्हापूर ४,३०१, लातूर १,४७२, नागपूर २,६७४, नांदेड ९७४, नंदुरबार ६१२, नाशिक २,४१७, उस्मानाबाद ५८१, पालघर ३८२, परभणी ५७२, पुणे ३,४५३, रायगड ६९१, रत्नागिरी ४,६८९, सांगली ८४३, सातारा १,९६६, सिंधुदुर्ग २,११८, सोलापूर २,१९०, ठाणे १,५९५, वर्धा ७१२, वाशिम ३९४, यवतमाळ २,२०८.

Leave a Reply

Your email address will not be published.