कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; नागरिकांना स्वतः वीज मीटरचं रिडींग पाठवण्याचं आवाहन

राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्राहकांना स्वतः वीज मीटरचं रिडींग पाठवण्याचं आवाहन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे. त्याचबरोबर वीज बिल तयार झाल्यानंतर ते वेळेवर भरुन महावितरणला सहकार्य करा असंही त्यांनी म्हटलं आहे.  

गेल्यावर्षी प्रमाणं सध्याही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने स्वतःच आपल्या वीज मीटरचं रिडींग घेऊन ते महावितरणला पाठवून देण्याची मुभा नागरिकांनी देण्यात आली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यासंदर्भात ट्विट करुन नागरिकांना महावितरणला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश ऊर्जामंत्र्यांनी महावितरण व्यवस्थापनाला दिले आहेत.

भारतासाठी पुढील चार आठवडे चिंताजनक; केंद्राचा गर्भित इशारा

राज्यात सध्या कोरोनाचा उद्रेक झाला असून दररोज मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या घरापर्यंत जाणं टाळावं या दृष्टीनं ऊर्जामंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, गेल्या वर्षी हा प्रयोग राबवल्यानंतर वाढलेल्या कालावधीमुळे आलेल्या वाढीव वीजबिलांमुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. यापार्श्वभूमीवर सध्याची वीजबिलं वेळेवर भरण्याचे आवाहन ऊर्जामंत्र्यांनी नागरिकांना केलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

Web Title: Appeal to the citizens to send the reading of the electricity meter themselves

<!–

–>

Leave a Reply

Your email address will not be published.