गाण्यातून होतो कोरोनाचा अधिक प्रसार; वाचा सविस्तर

मुंबई – कोरोनाबाधित रुग्णाचा स्पर्श किंवा खोकणे, शिंकणे याद्वारेच कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. मात्र, आता बाधिताच्या गाण्यामुळे विषाणूंचा शिंकण्या-खोकण्यापेक्षा अधिक प्रसार होत असल्याचे संशोधनातून आढळले आहे. ब्रिटनच्या ‘सायंटिफीक ॲडवायजरी ग्रुप ऑफ इमर्जन्सी’ने हे संशोधन केले आहे. त्यामुळे संगीत कार्यक्रम टाळण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला.
– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
रुग्णाच्या शिंकण्या-खोकण्यामुळे त्याच्या तोंडातून वेगाने विषाणू निघतात. मात्र, नव्या संशोधनानुसार संक्रमित व्यक्तीच्या गाण्यामुळे बोलणे किंवा खोकण्याच्या तुलनेत अधिक विषाणू बाहेर पडतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी हे संक्रमण वेगाने पसरण्याची शक्यता असते. जगभरात संगीत कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणावर होते.
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
अशा ठिकाणी मोठी गर्दीही होते. मात्र, गायक बाधित असल्यास संक्रमणाचा धोका संशोधकांनी वर्तवला आहे. एवढेच नव्हे तर कार्यक्रमात गायकासोबत प्रेक्षकदेखील गाणे गातात, त्यामुळे संसर्गाचा धोका अधिक वाढत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. त्यामुळे सध्यातरी अशा कार्यक्रमांना प्रत्यक्ष हजर न राहण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
Edited By – Prashant Patil