गेल्या पाच वर्षांपासून परतीच्या मॉन्सूनचे वेळापत्रक बदलले

पुणे – देशभरात गेले तीन ते चार महिने समाधानकारक हजेरी लावलेल्या मॉन्सूनचा परतीचा प्रवास ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात सुरू होणार आहे. सध्या अनेक भागांत पाऊस सुरू असल्याने या वर्षीही परतीचा प्रवास लांबला आहे. सर्वसाधारणपणे मॉन्सूनचा परतीचा प्रवास एक सप्टेंबरला सुरू होतो. मात्र, राजस्थानमध्ये परतीच्या मॉन्सूनसाठी ३० सप्टेंबर दरम्यान पोषक वातावरण तयार होईल, असे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गेल्या पाच वर्षांपासून परतीच्या मॉन्सूनचे वेळापत्रक बदलले आहे. मॉन्सूनची पश्चिम राजस्थानमधून माघारी फिरण्याची सर्वसाधारण तारीख एक सप्टेंबर आहे. त्यानंतर १५ ऑक्टोबरच्या आत मॉन्सून देशाच्या सर्व भागांतून बाहेर पडतो. गेल्यावर्षी मॉन्सूनचा परतीचा प्रवास ९ ऑक्टोबरला सुरू झाला होता. या वर्षीदेखील प्रवास  लांबला आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मागील ९ वर्षांतील परतीचा प्रवास
२३  सप्टेंबर २०११
२४ सप्टेंबर २०१२
९ सप्टेंबर २०१३
२३ सप्टेंबर २०१४
४ सप्टेंबर २०१५
१५ सप्टेंबर २०१६
२७ सप्टेंबर २०१७
२९ सप्टेबर २०१८
९ ऑक्टोबर २०१९

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Leave a Reply

Your email address will not be published.