गोंदियात महावितरणच्या लिपिकाचा 48.58 लाखांचा घोटाळा, आरोपी सुमित मेश्रामला अटक

गोंदिया : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या एका कर्मचाऱ्य़ांना 48 लाखांचा घोटाळा केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या उपविभाग कार्यालयातिल वरिष्ठ लिपिका हा घोटाळा केला आहे. या कर्मचाऱ्याने मार्च 2019 ते जून 2020 पर्यंतचे ग्राहकांकडून जमा केलेल्या बिलाची रक्कम कंपनीकडे जमा केली नसल्याचं उघड झालं आहे.

सुमीत मेश्राम असं वीज कर्मचाऱ्याचं नाव आहे. सुमीत मेश्राम याने मार्च 2019 ते जून 2020 पर्यंत ग्राहकांकडून 48 लाख 58 हजार 881 रुपये जमा केले. मात्र ही रक्कमी वीज वितरण कंपनीकडे जमा न करता स्वतः खर्च केल्याचं समोर आले आहे. या संदर्भात वीज वितरणाच्या उप विभागीय अभियंत्यांनी याची तक्रार आमगाव पोलिसात केली असून .पोलिसांनी 30 वर्षीय आरोपी सुमित पृथ्वीराज मेश्राम याला अटक केली आहे.

आरोपी सुमित मेश्राम हा आमगाव येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या स्थानिक उपविभाग कार्यालयात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहे. नोकरीवर असताना त्याने मार्च 2019 ते जून 2020 पर्यंत ग्राहकांकडून बिलाची रक्कम आपल्या कडे जमा केली. मात्र सदर रक्कम महावितरणाच्या खात्यात जमा न करता स्वतःच्या कामात आणून त्या रकमेची अफरातफर केल्याचे समोर आलं आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपविभाग आमगाव येथील कार्यकारी अभियंता धम्मदिप फुलझेले यांनी आमगाव पोलिसात आपल्याच कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार दिली. आमगाव पोलिसांनी कार्यकारी अभियंता धम्मदिप फुलझेले यांच्या तक्रारीवरून आरोपी सुमित मेश्रामविरुद्ध कलम 409, 420 अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीला न्यायालयात हजर केले. न्यायलयाने सुमीतला 22 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणात आणखी किती लोक आहेत का याचा शोध पोलीस घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.