‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत होणार; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती 

मुंबई : ‘जय जय महाराष्ट्र माझा’ (Jai Jai Maharashtra Mazha) हे राज्यगीत होणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Minister Sudhir Mungantiwar) यांनी दिली आहे. हे गाणं राज्य गीत झाल्यानंतर अधिकृत गाणं असलेल्या देशातील निवडक राज्यांच्या यादीत लवकरच महाराष्ट्राचा समावेश होऊ शकतो अशी माहिती मंत्री मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली आहे. राज्य सरकार ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्याचे अधिकृत राज्य गीत म्हणून अंतिम रूप देण्याच्या तयारीत आहे.  

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिन्दुस्तान टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत होणार असून. या गाण्यातून  महाराष्ट्र राज्य, इतिहास आणि संस्कृती आणि  उत्सवांचे कौतुक होईल.  या विषयावर चर्चा करण्यासाठी गेल्या महिन्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  

सध्या देशातील फक्त 11 राज्यांचेच स्वत:चे गाणे आहे. यात आता महराष्ट्राचे देखील स्वत:चे गीत असेल. अधिकृत राज्य गीत म्हणून ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गाण्याला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मान्यता मिळेल, अशी माहिती मंत्री मुनगंटीवार यांनी दिली आहे.  हे गीत कवी रादा बधे यांनी लिहिले आहे. तर श्रीनिवास खळे यांनी त्याला संगीत दिले आहे. कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी हे गीत गायले आहे. 2015 मध्ये शाहीर साबळे यांचे निधन झाले. साबळे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष राज्यात साजरे केले जात आहे. त्या निमित्ताने हे गीत  रिलीज होणार आहे. 

1 मे  1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले त्यावेळी मुंबईमधील दादर येथील शिवाजी पार्क येथे झालेल्या समारंभात शाहीर साबळे यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर हे गाणे गायले होते.  

‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत 1.15 ते 1.30 मिनिटांत बसेल असे नियोजन केले जात आहे. राष्ट्रगीताची वेळ देखील फक्त 52 सेकंद आहे.  या गाण्यातील मूळ  शब्द बदलले जाणार नाहीत. कार्यक्रमांच्या सुरुवातीला हे गाणे गायले जाईल आणि राष्ट्रगीताने संबंधित कार्यक्रमाची सांगता होईल, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या  

सहा रबी पिकांचा MSP वाढवला, गव्हाच्या किमतीत 110 रुपयांची तर मसूरमध्ये 500 रुपयांची वाढ; कॅबिनेटचा निर्णय  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *