जाणून घ्या तीन मिनटात दिवसभरातील टॉप १० न्यूज; पाहा व्हिडीओ

[embedded content]

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने पुन्हा एकदा जगाला आपली ताकद दाखवलीये. शनिवारी दुपारी तीन वाजून 2 मिनिटांनी PSLV-C49 च्या माध्यमातून 10 उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आलंय.सविस्तर बातमी

डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार ज्यो बायडन विजयापासून काही पावले दूर आहेत. या पार्श्वभूमीवर बायडन यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केलंय. आपण सहजपणे जिंकतोय, अस ते म्हणालेत. सविस्तर बातमी-

सरन्यायाधीशांवरील टि्वट; प्रशांत भूषण यांनी ‘चुकी’बद्दल मागितली माफी सविस्तर बातमी-

विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावांची यादी शुक्रवारी महाविकास आघाडीकडून राज्यपालांना सादर करण्यात आली. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीये. महाराष्ट्राचे राज्यपाल या बाबतीत कोणताही राजकीय ‘बखेडा’ निर्माण करणार नाहीत. राज्यपाल सुज्ञ आहेत, राज्यपालांवर आमचं प्रेम आहे आणि राज्यपालांचे आमच्यावर प्रेम आहे, असं ते म्हणालेत. सविस्तर बातमी

अभिनेता बॉबी देओल याची आगामी ‘आश्रम 2’ ही वेब सीरिज प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलीये. करणी सेनेने प्रकाश झा यांना कायदेशीर नोटीस पाठवलीये. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आलीये. सविस्तर बातमी-

आरोग्य मंत्रालयाद्वारे शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 84 लाखांच्या पुढे गेलीये. गेल्या 24 तासांत  50,314 नवे रुग्ण सापडले आहेत. गेल्या काही दिवसात महामारीचा वेग मंदावल्याचं दिसतंय. सविस्तर बातमी-

 

Leave a Reply

Your email address will not be published.