जिओचे इयत्ता तिसरी ते बारावीसाठी 4 माध्यमांमध्ये जिओ टीव्हीवर 12 शैक्षणिक चॅनेल सुरू

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि त्यात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व त्यांचे शिक्षण शाळा बंद असून सुद्धा सुरू राहावे, यासाठी शालेय शिक्षण विभाग विविध पर्यायांचा अवलंब करतोय. त्यात आता इयत्ता तिसरी ते इयत्ता बारावीसाठी जिओ टीव्हीवर 12 शैक्षणिक चॅनेल सुरू केले असून हे मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी या चार माध्यमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. तर दुसरीकडे पहिली ते दहावी मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने चार युट्यूब चॅनेल सुरु केले असल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्यासोबतच लवकरच हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसाठी सुद्धा युट्यूब चॅनेल सुरु होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

याआधी शिक्षण विभागाने जिओ टीव्हीवर 3 शैक्षणिक चॅनेल आणि एक रेडिओ चॅनेल सुरू केले होते त्यात आता आणखी भर पाडून एकूण 12 शैक्षणिक चॅनेल तिसरी ते बारावी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केले आहे. शिवाय, महाराष्ट्र राज्य हे पहिलं असं राज्य आहे, ज्याने मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी या चारही माध्यमातून शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी हे शैक्षणिक चॅनेल सुरु केले आहे. तर दुसरीकडे जिओ टीव्ही अॅप उपलब्ध नसणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या इयत्ता पहिली ते दहावीच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने चार युट्यूब चॅनेल सुरु केले आहेत. लवकरच हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसाठी सुद्धा सुरु होणार आहेत.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र तर्फे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी खालील 12 शैक्षणिक टी.व्ही channel हे जिओ टी.व्ही (जिओ सिम धारक यांना उपलब्ध) वर ज्ञानगंगा या नावाने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे ज्याने चार माध्यमांसाठी शैक्षणिक channel सुरु केले आहेत.

1) ज्ञानगंगा – 12 वी विज्ञान
2) ज्ञानगंगा – 10 वी इंग्रजी माध्यम
3) ज्ञानगंगा – 10 वी मराठी माध्यम
4) ज्ञानगंगा – 10 वी उर्दू माध्यम
5) ज्ञानगंगा – 9 वी इंग्रजी माध्यम
6) ज्ञानगंगा – 9 वी मराठी माध्यम
7) ज्ञानगंगा – 9 वी उर्दू माध्यम
8) ज्ञानगंगा – 8 वी मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम
9) ज्ञानगंगा – 7 वी मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम
10) ज्ञानगंगा – 6वी मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम
11) ज्ञानगंगा – 5 वी मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम
12) ज्ञानगंगा – 3 री व 4 थी मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम

हे चॅनेल कसे सुरू करणार ?

हे चॅनेल पाहण्यासाठी जिओ टी.व्ही या अॅपवर कॅटेगरीमधून एज्युकेशनल (Educational) निवडावे व वरील चॅनेल मधील आपल्याला पाहावयाचे Channel निवडायचे आहे. जिओ टी.व्हीवर प्रक्षेपित होणारे सर्व व्हिडीओ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या यु ट्यूब चॅनेलवर देखील उपलब्ध होणार आहे.

परिषदेकडून प्रसारीत होणाऱ्या अभ्यासक्रमाला, प्रशिक्षणे, अवांतर वाचनाची पुस्तके, विविध शासन निर्णय, शाळा, पालक, विद्यार्थी, शिक्षक यांना आवश्यक असणारी माहिती तात्काळ आपल्या मोबाईल वर प्राप्त करून घ्यावयाची असल्यास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या Jio Chat Channel ला विद्यार्थी जॉईन होऊ शकता.

यासाठी आपल्या स्मार्टफोन मध्ये जिओ चॅट हे अॅप प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करावे लागणार आहे. आपला मोबाईल क्रमांक व नाव टाकून अॅपमध्ये नोंदणी करा व Channel मध्ये SCERT, Maharashtra हे चॅनेल शोधा व त्याला जॉईन करा अथवा खालील लिंक ला क्लिक करून चॅनेलला जॉईन करता येऊ शकते.

Link :  https://jiochat.com/channel/600000000955/1

संबंधित बातम्या :

Leave a Reply

Your email address will not be published.