तर जी शिक्षा देणार ती भोगण्यास तयार : गिरीश महाजन

जळगाव : तीन वर्षापुर्वीच्या विषयाचा खोटा गुन्हा दाखल केला जात आहे. याबाबत कोण खरे आणि कोण खोटे याची सखोल चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयात मागणी करणार आहे. पण खोटे गुन्हे दाखल करून कोणी मोठे होणार नसून, या प्रकरणात एक टक्‍का जरी तथ्‍य आढळून आले तर जी शिक्षा देणार ती भोगण्यास तयार असल्‍याचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबई येथे झालेल्‍या पत्रकार परिषदेत स्‍पष्‍ट केले.

जळगावातील एका शैक्षणिक संस्थेचा ताबा देण्यास नकार दिल्यामुळे संस्था संचालकाचे अपहरण करुन, चाकुचा धाक दाखवित धमकाविणे तसेच पाच लाख रूपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी भाजप नेते गिरिश महाजन यांच्यासह जळगावमधील 31 जणाविरुद्ध कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आपली भुमिका मांडताना महाजन म्‍हणाले, की खंडणीप्रकरणाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करणे या मागे सुडाचे राजकारण असण्यास नकार देत खोट्या गुन्ह्याबाबत कोणत्‍याही यंत्रणेतून चौकशी करून सत्‍यता समोर आणण्यासाठी उच्च न्यायालयाकडे दाद मागणार असल्‍याचे ते म्‍हणाले.

त्‍यांनीही ईडीला सामोरे जावे
ज्‍येष्‍ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस आल्‍याबाबतच्या विषयार बोलताना ते म्‍हणाले, की सदर प्रकरणाची चौकशी अनेक दिवसांपासून सुरू आहे. आता ईडीची नोटीस आली असून, त्‍याला खडसेंनी सामोरे जाण्यास हरकत नाही. एक रूपयाचा देखील अपहार केला नसल्‍याचे खडसेंचे म्‍हणणे असून त्‍यांनी ईडीला सामोरे जावे. तसेच ईडी लावली की सीडी लावणार या प्रश्‍नावर महाजन म्‍हणाले, की त्‍यांच्याकडे काही असेल तर त्‍यांनी दाखवावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

Web Title: marathi news jalgaon girish mahajan press jalgaon education matter fir

<!–

–>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *