‘ती’ने दोन चिमुकल्यासह विजयपूर रोडवरील तलावात घेतली उडी पण…

सोलापूर : अक्कलकोट रोड परिसरातील रहिवासी असलेली 25 ते 28 वर्षीय महिला रिक्षात बसून दोन चिमुकल्यासह विजयपूर रोडवरील धर्मवीर संभाजीराजे तलावाजवळ उतरली. काही वेळातच तिने कशाचाही विचार न करता दोन चिमुकल्यासह तलावात उडी घेतली. परंतु, दैव बलवत्तर म्हणून तिच्यासह दोन मुलांचा जीव वाचला. त्याठिकाणी थांबलेले दिनेश अरुण जाधव हे देवदूत म्हणून मदतीला धावले. त्यांनी त्या दोन चिमुकल्यांना पहिले बाहेर ओढले आणि त्यानंतर महिलेला तलावातून बाहेर काढले. त्यामुळे तिघांचाही जीव वाचला.

नवऱ्याने दुसरे लग्न केल्याने उचचले पाऊल 
दोन मुले झाल्यानंतरही पतीकडून त्रास सुरुच आहे. पतीने परस्पर दुसरे लग्न केले असून तो मुलांकडे लक्ष देत नाही. त्या मानसिक त्रासाला कंटाळून या महिलेने हे पाऊल उचचल्याची चर्चा त्याठिकाणी सुरु होती. त्या महिलेला सदर बझार पोलिसांनी पोलिस ठाण्यात नेले असून गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, संभाजी ब्रिगेडतर्फे दिनेश जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दोन चिमुकल्यांसह महिलेचा जीव वाचविणारे जाधव देवदूत म्हणून मदतीला धावले. त्यांचा पोलिस आयुक्‍तालय, महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करावा, अशी मागणीही श्‍याम कदम यांनी यावेळी केली. 

विजयपूर रोडवर कामानिमित्त आलेले दिनेश जाधव आपले काम आटोपून तलाव परिसरात आले. धर्मवीर संभाजीराजे तलाव जलपर्णीमुक्‍त होत असल्याने जाधव हे कुतूहलाने त्याठिकाणी थांबले. तलाव परिसर पाहत असतानाच एक महिला रिक्षातून घाईगडबडीने उतरुन तलावाच्या दिशेने निघाल्याचे त्यांनी पाहिले. तिच्यासोबत दोन चिमुकली होती. एक मुलगा कंबरेवर तर दुसरा बोट धरुन चालत होता. काही वेळातच त्या महिलेने तलाव गाठला आणि दोन चिमुकल्यासह तलावात उडी घेतली. तिच्यासोबत असलेल्या दोन चिमुकल्यांना कशाचीच कल्पना नव्हती. आईसोबत दोघेही तलावात पडली. प्रसंगावधान साधून दिनेश जाधव यांनी तत्काळ तलावात उडी मारली. बुडत असलेल्या दोन चिमुकल्यांना अगोदर त्यांनी बाहेर काढले. त्यानंतर त्या महिलेला बाहेर ओढले. ही घटना झाल्यानंतर त्याठिकाणी भरपूर लोक जमा झाले. विजापूर नाका आणि सदर बझार पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारीही घटनास्थळी हजर झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेस, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्‍याम कदम आदींनी त्याठिकाणी धाव घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

Web Title: She jumped into the lake on Vijaypur Road with two boys

<!–

–>

Leave a Reply

Your email address will not be published.