दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा डिसेंबरमध्ये? आजपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात 

सोलापूर ः कोरोना संसर्गामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष पूर्णपणे रखडले आहे. मार्चच्या दरम्यान याचा प्रसार सुरु झाल्याने दहावीचा भूगोलाचा पेपरही रद्द करावा लागला होता. मागील सहा-सात महिन्यांपासून कोरोना संसर्गामुळे दहावी-बारावीच्या ऑक्‍टोबरच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्या परीक्षा आता डिसेंबरमध्ये होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्याची प्रक्रिया परीक्षा मंडळाने सुरु केली आहे. विलंब शुल्कासह दोन नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. 

मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार होण्यापूर्वी बारावीच्या परीक्षा पूर्ण झाल्या होत्या. त्यामुळे त्या परीक्षेचे पेपर रद्द झाले नाहीत. मात्र, कोरोना प्रसाराच्या काळात दहावीचा भूगोल विषयाचा पेपर अडकला. शेवटी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमीक परीक्षा मंडळाला दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करावा लागला. त्या विषयाचे गुण विद्यार्थ्यांना देण्यात आले. दहावी-बारावीचे निकाल लागल्यानंतर सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये पुरवणी परीक्षा घेतली जात होती. मात्र, काही केल्योरोनाचा संसर्ग थांबत नसल्याने त्या परीक्षा घेता आल्या नाहीत. त्यामुळे परीक्षा मंडळाने आजपासून त्या परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यास सुरवात केली आहे. कोरोना संसर्गाच्या काळात ऑनलाइन अर्ज भरताना सोशल डिस्टन्स पाळण्याच्या सूचनाही मंडळाने दिल्या आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

Web Title: 10th-12th supplementary examination in December? Start filling online application from today

<!–

–>

Leave a Reply

Your email address will not be published.