दूध भुकटी योजना आणि मच्छिमारांना सहाय्य; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई – लॉकडाउनच्या परिस्थितीत अतिरिक्त दुधाचे भुकटीत रूपांतर करण्याची योजना आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांकरिता राबविण्यास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. महाड दुर्घटनेतील वारसांना मदतही यावेळी जाहीर करण्यात आली.

– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमुळे राज्यात निर्माण होणाऱ्या दुधाच्या मागणीत प्रचंड घट झाल्यामुळे राज्यात अतिरिक्त दुधाची परिस्थिती निर्माण होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी कमी दर प्राप्त होऊ लागला. त्यामुळे त्याची भुकटी करून ही भूकटी भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना, गर्भवती, स्तनदा मातांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही योजना सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेसाठी शासनामार्फत १९८.३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. 

– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मच्छीमारांना विशेष मदत
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘क्यार’ व ‘महा’ या चक्रीवादळांमुळे मच्छीमारांना मासेमारी न करता आल्यामुळे झालेल्या नुकसानीबद्दल ६५ कोटी १७ लाख इतके विशेष सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय आज घेण्यात आला. याचा लाभ ५४ हजार ५७३ मच्छीमारांना मिळेल. हा लाभ त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.

महाड दुर्घटनेप्रकरणी मदत
महाडमधील इमारत दुर्घटनेत १६ जण मृत्युमुखी पडले असून मृतांच्या वारसांना राज्य आपत्ती सहायता निधीतून (एसडीआरएफ) प्रत्येकी ४ लाख रुपये आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून १ लाख असे ५ लाख रुपये मदत देण्यात येणार असल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. 

अन्य निर्णय 

  • शहरी भागातील आरोग्य सेवेसाठी ७ नियमित पदांच्या निर्मितीस मान्यता.
  • नाशिक जिल्ह्यातील काष्टी (ता.मालेगाव) येथे कृषी विज्ञान संकुल निर्मितीस मान्यता. 
  • मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील आठ महानगरपालिका आणि सात नगरपालिकांसाठी स्वतंत्र झोपडपट्टी  पुनर्वसन प्राधिकर

Edited By – Prashant Patil

Leave a Reply

Your email address will not be published.