देशात सहा महिने पुरेल इतकी साखर शिल्लक; खरेदी दर वाढविण्याची गरज 

सोलापूर ः देशात अद्यापही सहा महिने पुरेल इतकी साखर शिल्लक आहे. त्यामुळे आता उत्पादीत केलेली साखर पडूनच राहणार आहे. साखर विक्रीसाठीचा दर 35 रुपये प्रतिकिलो करणे गरजेचे आहे. अनेक कारखाने इथेनॉलची निर्मिती करत आहेत. मात्र, त्याच्या खरेदी दरामध्ये वाढ करणे अपेक्षित असल्याचे मत लोकमंगल साखर कारखान्याचे अध्यक्ष महेश देशमुख यांनी व्यक्त केले. 

बीबी दारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथील लोकमंगल कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन व गाळप हंगामाची सुरवात आज एकाच दिवशी झाली. त्यावेळी श्री. देशमुख बोलत होते. बॉयलर पूजन वडवळ (ता. मोहोळ) येथील शेतकरी शहाजी देशमुख व त्यांच्या पत्नी साधना यांच्या हस्ते झाले. त्याचबरोबर गव्हाणीत सुधाकर महाराज इंगळे व अनंत महाराज इंगळे यांच्या हस्ते मोळी टाकून गाळप हंगामाची सुरवात करण्यात आली. 
श्री. देशमुख म्हणाले, कोरोनाच्या संकटावर मात करत कारखाना सुरु झाला आहे. यंदाच्या हंगामात जास्तीत-जास्त गाळप करण्यावर भर राहणार आहे. यंदाच्या वर्षी पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे पुढील तीन हंगाम तरी कारखानदारीला चांगले दिवस आणणारे जातील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. हंगाम चालू झाल्यानंतर ऊस उत्पादक शेतकरी, वाहन मालक, कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी सुधाकर महाराज इंगळे यांनी गाळप हंगामास शुभेच्छा दिल्या. 
यावेळी कारखान्याचे संचालक प्रशांत पाटील, शिवाजी पाटील, अरुण बारसकर, रणजित ननवरे, अमोल साठे, दिगंबर ननवरे, बालाजी पाटील, सौदागर साठे, नाना सावंत, औदुंबर मसलकर, बाळासाहेब पाटील, अमोल सावंत, सागर काळे, मुकुंद ढेरे, राजू हावळे, बंडू हावळे, अंबादास ढेरे, हरिदास पवार, नामदेव पवार, मुरारी शिंदे, संजय सुरवसकर, तानाजी हांडे, नरसिंह पाटील, प्रकाश जगताप, नागेश नीळ, चंद्रकांत वाघमोडे, जयवंत जाधव, भारत पालकर, ज्ञानदेव माडकर, रामदास शिंदे, नीलकंठ जाधव, प्रदीप काळे, अण्णासाहेब ढवळे, चेतन काळे, तुकाराम यादव, विशाल देशमुख, राजू नन्नवरे, सचिन नन्नवरे, भारत राऊत, संतोष साठे उपस्थित होते. विवेक पवार यांनी सूत्रसंचालन केले. सुनील घालमे यांनी आभार मानले. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *