धक्कदायक ! कॅनमध्ये पेट्रोल दिलं नाही म्हणून थेट विषारी सापाचा प्रयोग, वाचा नक्की घडलंय काय ?

एखादी गोष्ट पटली नाही किंवा एखादी गोष्टी आपल्या मनासारखी झाली नाही तर कोण काय करेल हे सांगता येत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार बुलडाण्यात घडलाय. कॅनमध्ये पेट्रोल देण्यास पंप चालकाने नकार दिला. या गोष्टीचा कमालीचा राग आल्याने एक व्यक्तीने थेट मालकाच्या केबिनमध्ये विषारी सापच सोडला. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरच्या या घटनेचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे.

लॉकडाऊन कालावधीत पेट्रोल, डिझेल देण्यावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हे तर कोणालाही बाटली, कॅन किंवा ड्रममध्ये इंधन देऊ नये अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत आणि त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासही सांगितले आहे. मात्र हे सगळ्यांनाच मान्य होत नाही. बुलढाणा जिल्ह्यात नेमके हेच घडले आणि त्यावरुन चिडलेल्या माणसाने कहरच केला. 

मोठी आनंदाची बातमी : मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर पोहोचला तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांवर

मलकापूरला येथील चौधरी पेट्रोल पंपावर आलेल्या एकाने कॅनमध्ये पेट्रोल देण्याची मागणी केली. अर्थातच कर्मचाऱ्यांनी ही मागणी फेटाळली. त्याने तेथील प्रमुखांकडे जाण्याचे ठरवले. त्या पंपावरील कामाचे नियंत्रण एक महिला करीत होती. त्याने तिच्याकडे जाऊन कॅनमध्ये इंधन देण्याची मागणी केली. तिने ही या व्यक्तीची मागणी फेटाळल्यावर त्याने आपल्याकडील प्लॅस्टिक पिशवीतील मोठा विषारी सापच महिलेच्या केबिनमध्ये सोडला.  

ही सर्व घटना CCTV मध्ये नोंदली गेली आहे आणि त्याचाच व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. परिसरातील साप पकडणाऱ्या एकाने केबिनमध्ये सोडलेल्या या सापाला पकडले. पंप चालकांनी आता साप सोडलेल्यांविरुद्ध तक्रार  दाखल केली आहे. साप सोडलेली व्यक्ती साप पकडणारी असल्याचे सांगण्यात येते. 

(संकलन – सुमित बागुल )

petrol pump owner refused to give petrol in bottle angry customer thrown snake in the pump office

Leave a Reply

Your email address will not be published.