धक्कादायक : राज्यात कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक

मुंबई : रविवारी दिवसभरात राज्यात तीन हजार 870 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या एक लाख 31 हजार 075 झाली आहे. रविवारी राज्यात 170  रुग्ण दगावले असल्याची नोंद करण्यात आली असून, त्यातील 69 मृत्यू हे अगोदरचे आहेत. राज्यात एकूण मृतांचा आकडा 6 हजार 170 इतका झाला आहे. 

राज्यात आज रोजी एकूण 60,147  ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रविवारी राज्यात एक हजार 591 रुग्ण बरे झाले असून, आजपर्यंत एकूण 65 हजार 744 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यभरात दिवसभरात 170 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी 69 मृत्यू हे मागील कालावधीतील आहेत. उर्वरित 101 मृत्यूंपैकी आरोग्यमंडळ निहाय मृत्यू पुढील प्रमाणे आहेत. मुंबई 41, ठाणे मनपा 29, नाशिक 7, अहमदनगर 1,  पुणे 14 ,  औरंगाबाद 1, लातूर 1 ,  अकोला 4,  अमरावती- 1, बुलढाणा 1 ,  वाशिम 1 यांचा समावेश  आहे. मुंबई पालिकेने कळविलेल्या 110 मृत्यूंपैकी 41 मृत्यू हे मागील 48 तासांतील असून 69 मृत्यू हे 18 एप्रिल ते 18 जून या कालावधीतील आहेत. 

आरे वसाहतीत मेट्रो कारशेड उभारण्याचा मार्ग मोकळा

राज्याचा मृत्यूदर 4.67 टक्के
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 49.78 टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यूदर 4.67 टक्के आहे. सध्या राज्यात सहा लाख 66 लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 26 हजार 287 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 7 लाख 73 हजार 865  नमुन्यांपैकी 1 लाख 32 हजार 75 (17.06 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

कोरोनाचा कहर! मुंबईत उपनिरिक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू; SRPF मध्ये होते कार्यरत..

Leave a Reply

Your email address will not be published.