नागपूर जिल्ह्यात तब्बल दहा वर्षांनंतर दिसला माळढोक 

नागपूर : डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थानने तीन वर्षापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात एकही माळढोक पक्षी नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे माळढोक खरंच महाराष्ट्रातून ‘इकॉलॉजीकली डेड’ झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला गेला होता. मात्र, नागपूर तालुक्यात आणि चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा येथे माळढोक पक्षाचे दर्शन झाल्याने पक्षीप्रेमींना सुखद धक्का बसला आहे. यामुळे या नामशेष होत असलेल्या पक्ष्याचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी वन विभागाला याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. 

नागपूर जिल्ह्यात २०१० मध्ये ठेमसाना परिसरात माळढोक पक्षी दिसला होता. त्याच परिसरातील शेतकरी प्रभाकर हूड यांच्यासह दोन ते तीन शेतकऱ्यांनी शनिवारी दोन माळढोक पक्षी पाहिले. हा वेगळा पक्षी असल्याने त्यांनी ही माहिती वन विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी श्री. चिखले यांना दिली. चिखले यांनी राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य कुंदन हाते यांच्याशी संपर्क करुन हा पक्षी माळढोक आहे का याची विचारणा केली. हाते यांनी संबंधितांना माळढोक पक्ष्यांचा फोटो पाठविला. शेतकऱ्यांनी पाहिलेला पक्षी हाच असल्याचे सांगितले. त्यामुळे माळढोक पक्षी पुन्हा नागपूर जिल्ह्यात दिसल्याचे शिक्कामोर्तब झाले. 

पेंच प्रकल्पातील वन कर्मचाऱ्यांवर मासेमारांनी केला जीवघेणा हल्ला, जवानांचा सुरक्षेसाठी गोळीबार

इटरनॅशनल युनियन फॉर कंन्झरव्हेशन ऑफ नेचरने (IUCN) यापूर्वीच माळढोकला अतिसंकटग्रस्त म्हणून जाहीर केले. या पक्ष्याची आता महाराष्ट्रातली संख्या इतकी कमी झाली आहे की, त्यात वाढ होणे आणि त्यांचे पुनरुज्जीवन होण्याची शक्यता जवळपास संपली असल्याचे बोलले जात होते. डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थाने केलेल्या सर्वेक्षणात वन विभागाचाही सहभाग होता. आता त्याचे दर्शन झालेले आहे. 

पक्षी प्रेमींसाठी सुखद धक्का 

नागपूर जिल्ह्यात माळढोक पक्षी २०१० साली दिसला होता. त्यानंतर आता पुन्हा त्याचे दर्शन झाल्याने हा पक्षी प्रेमींसाठी सुखद धक्का आहे. दोन दिवसापुर्वी मला पक्षी दिसल्याची माहिती कळाली. त्यामुळे पाठपुरावा केल्यानंतर हा पक्षी माळढोक असल्याचे स्पष्ट झाले. आता त्याचे संवर्धन व संरक्षण वन विभागाने करणे गरजेचे आहे. 
कुंदन हाते, संदस्य राज्य वन्यजीव मंडळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

Web Title: Two Great Indian Bustards Sighted in Nagpur District after Ten Years

<!–

–>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *