‘निगेटिव्ह’ असाल तरच महाराष्ट्रात प्रवेश मिळेल, राज्य सरकारने जारी केली नवी नियमावली

मुंबई : दिवाळीनंतर कोरोना रुग्णसंख्या वाढताना पाहायला मिळतेय. अशात ज्या राज्यांमध्ये  कोरोनाचा प्रभाव जास्त आहे, जिथे कोरोना रुग्णसंख्या जास्त आहे अशा राज्यातून महाराष्ट्रात यायचे असल्यास काही कठोर नियम पाळले जाणार आहेत. महाराष्ट्राने महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. त्यामुळे या नव्या निर्देशांमुळे तुम्ही कोरोना निगेटिव्ह असाल तरच महाराष्ट्रात प्रवेश करू शकणार आहेत. विमानमार्गे, रेल्वे किंवा रस्तेमार्गाने येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी हे नियम पाळले जाणार आहेत. 

महत्त्वाची बातमी : राजेश टोपे म्हणालेत, “दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी बोलून ‘मोठा’ निर्णय घेणार”; महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन ?

 विमानाने येणाऱ्यांसाठीची नियमावली : 

 • दिल्ली NCR,राजस्थान, गुजरात आणि गोव्यातून विमानाने महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व प्रवाशांनी त्यांचे कोरोनाचे RT PCR मध्ये  निगेटिव्ह म्हणून नमूद केलेले  रिपोर्ट सोबत ठेवणे बंधनकारक आहे. 
 • सदर रिपोर्ट्स हे महाराष्ट्रात विमान उतारण्याआधी ७२ तास केलेले हवेत
 • ज्यांच्याकडे हे रिपोर्ट्स नसतील त्यांनी विमानतळावर RT PCR टेस्ट स्वतःच्या खर्चाने करणे बंधनकारक आहे
 • ज्या प्रवाशांनी विमानतळावर कोरोना चाचणी केलेली आहे अशांच्या फोन नंबर आणि पत्ता देखील घेण्यात येईल, जेणेकरून टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास संबंधितांशी संपर्क साधता येईल 

महत्त्वाची बातमी :  लोकलबाबत मंत्री विजय वडेट्टीवार यांचं ‘महत्त्वाचं’ विधान, सोबत ‘मिनी’ लॉकडाऊनचेही संकेत

रेल्वेने येणाऱ्यांसाठीची नवीन नियमावली :

 • दिल्ली NCR,राजस्थान, गुजरात आणि गोव्यातून रेल्वेने महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व प्रवाशांनी त्यांचे कोरोनाचे RT PCR मध्ये  निगेटिव्ह म्हणून नमूद केलेले रिपोर्ट सोबत ठेवणे बंधनकारक आहे. 
 • सदर रोपार्ट्स हे महाराष्ट्रात विमान उतारण्याआधी ९६ तास आधी केलेले हवेत
 • ज्यांच्याकडे RT PCR रिपोर्ट्स नाहीत अशांची रेल्वे स्टेशनवर लक्षांची तपासणी होईल, ज्यामध्ये शरीराचे तापमान आणि इतर लक्षणे तपासली जातील.
 • लक्षणे नसणाऱ्या प्रवाशांना घरी जाऊ दिलं जाईल 
 • लक्षणे असणाऱ्या प्रवाशांची चाचणी केली जाईल, चाचणीमध्ये रिपोर्ट निगेटिव्ह आलेत तरच त्यांना घरी सोडण्यात येईल 
 • ज्याची चाचणी पॉसिटीव्ह आली आहे अशाना किंवा टेस्ट न करवून घेणार्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येईल. ज्याचा खर्च प्रवाशांना करावा लागणार आहे. 
 • संबंधित शहराच्या महापालिका अधिकाऱ्यांनी सादर नियम पाळले जातायत का याची काळजी घ्यायची आहे. 

महत्त्वाची बातमी : कोरोना लसीबाबत उत्सुकता, भारत बायोटेकची लस घेण्यासाठी 300 जण उत्सुक

रस्तेमार्गाने येणाऱ्यांसाठीची नवीन नियमावली :

 • दिल्ली NCR,राजस्थान, गुजरात आणि गोव्यातून रस्ते मार्गाने महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व प्रवाशांची महाराष्ट्र्र सीमेवर कोरोना लक्षणांची तपासणी केली जाईल 
 • ज्यांना लक्षणे दिसतील त्यांना जिथून आले आहेत तिथे परत जाऊ दिले जाईल. केवळ लक्षण नसणाऱ्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश प्रवेश करू दिला जाईल 
 • ज्यांना लक्षणे आहेत त्यांना अँटीजेन टेस्ट करावी लागेल, अँटीजेन टेस्टमधील निगेटिव्ह प्रवाशांना महाराष्ट्रात येऊ दिलं जाईल 
 • ज्याची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे अशाना किंवा टेस्ट न करवून घेणार्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येईल. ज्याचा खर्च प्रवाशांना करावा लागणार आहे. 

restriction on the people coming from delhi goa rajasthan and gujrath to maharashtra only negetivh will be allowed to enter

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *