‘पतंजली’च्या कोरोनिलवर राज्यात बंदी – देशमुख 

मुंबई – योगगुरू बाबा रामदेव यांनी गाजावाजा करत कोरोनावर बाजारात आणलेल्या औषधाला राज्यात विकण्यास परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. 

योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’ने दोनच दिवसांपूर्वी कोरोनावर औषध निर्माण केल्याचा दावा करीत कोरोनावर ‘कोरोनिल’हे औषध पत्रकार परिषद घेऊन बाजारात आणले होते. मात्र, पतंजलीच्या या औषधाच्या विक्रीवर केंद्र सरकारने निर्बंध घातल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही या औषध विक्रीवर बंदी आणली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती ट्विट करून दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे रामदेव बाबांना मोठा झटका बसला आहे. कोरोनिलच्या क्लिनिकल ट्रायलबाबत कोणताही पुरावा नाही. जयपूर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या औषधाची क्लिनिकल ट्रायल करण्यात आली की नाही, याचा शोध घेणार आहे, त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनिलची विक्री होणार नाही, असे गृहमंत्री देशमुख यांनी ट्विट केले आहे. ‘आयुष’ मंत्रालयानेही बाबा रामदेव यांच्या या औषधावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत या औषधाच्या जाहिरातीवरही बंदी घातली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

Web Title: Home Minister Maharashtra Anil Deshmukh threatens legal action against Patanjali

Leave a Reply

Your email address will not be published.