‘पार्थ, तुम्ही जन्मत: फायटर’, पद्मसिंह पाटील यांच्या नातवाची पार्थ यांच्या समर्थनार्थ पोस्ट

उस्मानाबाद : “पार्थ पवार यांचं वक्तव्य इमॅच्युर असून त्यांच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही “, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारल्यानंतर, आता पार्थ पवार यांना आजोळातून समर्थन मिळालं आहे. पार्थ तुम्ही जन्मत: फायटर आहात, अशी पोस्ट नुकतेच भाजपवासी झालेले पद्मसिंह पाटील यांचे नातू मल्हार पाटील यांनी फेसबुकवर केली आहे.

पार्थ पवार यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार या पद्मसिंह पाटील यांच्या बहिण आहेत. अजित पवार आणि डॉ. पद्मसिंह पाटील हे नात्याने मेव्हणे आहेत. मल्हार पाटील हे तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजित सिंह यांचे चिरंजीव आहेत.उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे पार्थ पवार यांचे आजोळ आहे.

पार्थ पवार यांचं वक्तव्य इमॅच्युअर, त्यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही : शरद पवार

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या पार्थ पवार यांना शरद पवारांनी फटकारलं. यावर कोणतंही भाष्य करणार नाही, असं पार्थ पवार यांनी म्हटलं. तर अजित पवार यांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र त्याचवेळी आजोळातून मात्र पार्थ पवार यांना समर्थन मिळालं आहे.

मल्हार पाटील यांनी फेसबुकवर लिहिलं आहे की, “तुम्ही जन्मत: फायटर आहात आणि मी ते लहानपणापासून पाहिलं आहे. मला तुमचा अभिमान आहे. आपण उस्मानाबादचे आहोत आणि लढायचं कसं हे आपल्याला माहित आहे.”

शरद पवार काय म्हणाले होते?
पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली होती. तशा आशयाचं पत्र त्यांनी गृहमंत्र्यांना दिलं होतं. यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. याविषयी शरद पवार म्हणाले की, “नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही. त्यांचं वक्तव्य इमॅच्युअर आहे. परंतु सीबीआय चौकशी जर कोणाला करायची असेल, मी स्पष्ट सांगितलं की माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. पण कोणाला असं वाटत असेल की सीबीआय चौकशीची मागणी करावी, तर त्यालाही कोणी विरोध करायचं कारण नाही.”

पार्थ पवारांची प्रतिक्रिया
शरद पवार यांनी जाहीररित्या फटकारल्यानंतर पार्थ पवार यांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा होती. परंतु शरद पवारांच्या वक्तव्यावर कोणतंही भाष्य करण्यास पार्थ पवार यांनी नकार दिला. मला यावर काही बोलायचं नाही, असं पार्थ पवार यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

‘जय श्री राम’ म्हणत पार्थ पवारांच्या राम मंदिराला शुभेच्छा, सुप्रिया सुळे म्हणतात…

पार्थ पवार गृहमंत्र्यांच्या भेटीला; सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी

फोडाफोडीच्या राजकारणाला कोणाची फूस? पार्थ पवार यांचा पारनेर दौरा चर्चेत

Sharad Pawar | पार्थ पवार यांचं वक्तव्य इममॅच्युअर, त्यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही : शरद पवार

Leave a Reply

Your email address will not be published.