पृथ्वीराज चव्हाणांचा योगी आदित्यनाथांना खोचक सल्ला; वाचा सविस्तर बातमी!

मुंबई : कोरोनाजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रमुख नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महाआघाडीच्या सरकारवर नाराज आहात का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. सध्याच्या घडीला राज्य सरकार योग्य त्या पद्धतीने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहे. काही त्रूटी असतील ही पण सरकारवर नाराजीचा कोणताही मुद्दा मनात नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना खोचक सल्ला दिला. 

कोरोनासंदर्भात चौकशीच करायची असेलच तर…; चीनचे परराष्ट्रमंत्री काय म्हणाले वाचा

उत्तर प्रदेशच्या मुजुरांबाबत महाराष्ट्र सरकारने योग्य ती काळजी घेतली नाही, असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला होता. या मुद्यावरुन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. यावरही पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले. कोरोना विषाणूचे संकट हे एका घरावर, गावावर, राज्यावर किंवा एका देशावर आलेले नाही. ही वेळ राजकारण करण्याची नाही. योगी आदित्यनाथ यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवणे चुकीचे आहे. त्यांनी तसे करु नये. इतर राज्यातील जे मजूर उत्तर प्रदेशमध्ये आहेत त्यांच्याबाबत योगी सरकारने काय केलंय यावर मला बोलायच नाही, असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंची पाठराखण करत योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. 

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या पाच वर्षाच्या मुलाने ठरवले अन्… 

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाजन्य परिस्थितीत राज्याने पॅकेजची घोषणा करावी असे म्हटले होते. यावरही पृथ्वीराज यांनी भाष्य केले. राज्य सरकार कोणत्याही प्रकारचे पॅकेज जाहीर करत नसते. देवेंद्रजींना देखील याची पूर्ण कल्पना आहे. राजकारणाचा मुद्दा सोडला तर या मागणीमध्ये फार काही विशेष नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले. केंद्राप्रमाणेच राज्याने विशेष पॅकेज जाहीर करावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचा खास उल्लेख केला होता. 

गुजरात म्हणजे बुडणारं जहाज; उच्च न्यायालयाचे ताशेरे

कोरोनाजन्य संकटात राज्य आपल्यावरील जबाबदारी झटकत केंद्राकडे बोट दाखवण्याचा प्रकार सुरु आहे, असा प्रश्न दिसतो. यावरुन कोरोनाचा प्रश्न सुटणार नाही. मग अशा परिस्थितीत काय करावे? असा प्रश्नही पृथ्वीराज चव्हाण यांना विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, कोरोना विषाणूचा सामना करत असताना राज्याने -केंद्राने आपापलाला वाटा उचलत राजकारण बाजूला  ठेवून काम करण्याची गरज असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *