पेन्डिंग 427 रिपोर्टने वाढविली चिंता ! सोलापूर ग्रामीण कोरोनाचा हाहाकार, आज 153 नवे रुग्ण; शहरात 39 पॉझिटिव्ह 

सोलापूर : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच आता कोरोना या विषाणूने जिल्ह्यातही चांगला जम बसवायला सुरुवात केली आहे. मंगळवारपर्यंत (ता. 14) जिल्ह्यात 960 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते. बुधवार त्यात 153 रुग्णांची भर पडली असून आता ग्रामीणमधील एकूण रुग्णांची संख्या एक हजार 113 झाली आहे. तर शहरात 39 रुग्णांची संख्या भर पडली असून शहरातील एकूण रुग्णांची संख्या तीन हजार 384 झाली आहे. दुसरीकडे शहरातील मृतांची संख्या 310 तर ग्रामीणमधील मृतांची संख्या 41 झाली आहे. 

ग्रामीणमध्ये ‘या’ ठिकाणी आढळले नवे रुग्ण 
उत्तर सोलापूर तालुक्‍यातील कारंबा, नान्नज, मार्डी, हिरज, हगलूर, कोंडी, करमाळ्यातील जवळेकर हॉस्पिटलजवळील स्टाफ कॉर्टर्स, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, मंगळवेढ्यातील किल्ला बाग, निंबोनी, माढ्यातील कुर्डूवाडी, भोसरे, रिधोरे, बार्शीतील भवानी पेठ, खुर्पे बोळ, किराना रोड, मल्लप्पा धनशेट्‌टी रोड, मांगाडे चाळ, पवार प्लॉट, शिवाजी नगर, सुभाष नगर, भालगाव, दहिटणे, हाळदुगे, सासुरे, उंडेगाव, वैराग तर मोहोळमधील अण्णाभाऊ साठे नगर, बुधवार पेठ, दत्त नगर, कोष्टी गल्ली, साठे नगर, भांबेवाडी, कोरवली, सोहाळे येथे नवे रुग्ण सापडले आहेत. तर पंढरपुरातील अंबाबाई पटांगण, अनिल नगर, बागवान गल्ली, भगवान नगर, ज्ञानेश्‍वर नगर, गांधी रोड, घोंगडे वस्ती, लिंक रोड, रोहिदास चौक, संत पेठ, गोपाळपूर, करकंब, लक्ष्मी टाकळी, पुळूज, वाखरी, व्होळे येथे दर दक्षिण सोलापुरातील अंत्रोळी, बरुर, भंडारकवठे, बोरामणी, दोड्डी तांडा, कंदलगाव, मुळेगाव तांडा, विंचूर, येळेगाव येथे आणि अक्‍कलकोट तालुक्‍यातील अरब गल्ली, भारत गल्ली, बुधवार पेठ, खासबाग, मधला मारुती, माणिक पेठ, न्यू पॅलेस रोड, मैंदर्गी, चुंगी, तडवळ, उल्हास नगर, किणी येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे. हगलूर आणि भंडारकवठे येथील दोघांचा मृत्यू झाला आहे. 

शहरात ‘येथे’ सापडले नवे रुग्ण 
विद्यानगर सोसायटी (उत्तर सदर बझार), रोहिणी नगर (सैफूल), लक्ष्मी नगर (हत्तुरे वस्ती), कर्णिक नगर, सर्वोदय नगर (मुळेगाव रोड), नंदिमठ बोळ (शुक्रवार पेठ), उत्तर सदर बझार, महात्मा फुले वस्ती (मोदी), आशियाना नगर (जुळे सोलापूर), गरिबी हटाव झोपडपट्टी, प्रतापनगर (विजयपूर रोड), दत्तनगर (न्यू तुळजापूर नाका), अवंतीनगर (जुना पुना नाका), वानकर वस्ती (देगाव रोड), जम्मा वस्ती, धोत्रीकर वस्ती (भवानी पेठ), राधाकृष्ण अपार्टमेंट (उत्तर कसबा), साधुवासवानी बागेजवळ (गुरुनानक चौक), सोनिया नगर (विडी घरकूल), आंबेडकर हौसिंग सोसायटी (अंत्रोळीकर नगर), विकास नगर, काडादी नगर (होटगी रोड), सेटलमेंट कॉलनी क्र. एक, पुनित अपार्टमेंट (रेल्वे लाईन), उत्तर कसबा आणि विजयालक्ष्मी नगर (नई जिंदगी) येथे आज नवे 39 रुग्ण सापडले. 

तालुकानिहाय रुग्णसंख्या 

Leave a Reply

Your email address will not be published.