प्रत्येक शुभकार्यात नारळ का फोडतात ते जाणून घ्याच

पुणे : नेहमीच अनेकांच्या घरात काही पूजा असो, नवीन घरात प्रवेश असो, लग्नाची वरात घेऊन जात असो, नवीन वाहन घेतले असो किंवा नवे व्यवसाय सुरु करावयाचे असो. प्रत्येक वेळी कार्याच्या शुभारंभ करण्यासाठी नारळ फोडलाच जातो. हे सर्व सांगण्याचे निमित्त म्हणजे संपूर्ण जगात दोन सप्टेंबर हा जागतिक नारळ दिन म्हणून साजरा केला जातो. 

नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणलं जातं ते काही खोटं नाही, नारळाचे बहुगुणी उपयोग आहे. औषधी गुणयुक्त पोषक घटक नारळामध्ये लाख गुण असतील पण शुभ कार्यात पहिल्या क्रमांकावर श्रीफळचं आहे. नारळ मंगलमय असल्यामुळे प्रत्येक शुभकार्यात फोडलाच जातो. आपल्या हिंदू परंपरेनुसार नारळ सौभाग्यदायी आणि समृद्धीचे प्रतीक आहे. नारळाच्या वृक्षाचा प्रत्येक भाग हा उपयुक्त असतो.

नारळाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शुभ आणि मंगलदायी मानले गेले आहेत. आपल्या स्वयंपाकामधील अनेक पदार्थांमधील भाजी बनवताना नारळाचा वापर हमखास केलाच जातो. विशेष म्हणजे मांसाहारी मध्ये तर नारळ वापरल्याशिवाय भाजी चवच देत नाही. अनेक ठिकाणी नारळाचा वापर केलाच जातो.  

महेश जोशी म्हणाले, नारळ वरुन जितका कठोर असतो तितकाच सौम्य आतमध्ये असतो. श्रीफळ असेही नारळाला म्हटले जाते आणि ते मंगलमय असल्यामुळे प्रत्येक शुभकार्यात नारळ फोडलाच जातो.  

नारळाची पाने… 

नारळाचे आपल्या जीवनात खूप महत्वाचे स्थान आहे. म्हणजेच नारळाच्या पानांपासून झाडू, खराटा, टोपली घराचे छत, काथा, दोरखंड आणि चटई तयार करून वापरले जाते.   

नारळाचे खोड…. 

नारळाच्या खोडापासून फ़र्निचर आणि शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात. 

नारळाची करवंटी…  

नारळाच्या करवंटी पासून वाद्य, हस्तोद्योग, शेकोटी किंवा चुलीतले इंधन असा त्याचा वापर केला जातो. 
 
ओल्या नारळापासून… 

ओल्या नारळापासून आपल्याला पाणी, खोबरे, नारळाचे दूध आणि खाद्यपदार्थ निर्मितीचा वापर करता येतो. –

केस आणि त्वचा… 

नारळाचे तेल केस आणि त्वचेसाठी खूप लाभदायी आहे.

नारळ पाण्याचे फायदे…

– पोषक घटक भरपूर 
– वजन कमी करण्यासाठी लाभदायक 
– त्वचा उजळण्यासाठी फायदेशीर 
– पचनक्रियेसाठी लाभदायक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *