बापरे! पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल एवढ्या ग्राहकांचा वीजपुरवठा होणार खंडित

पुणे – एप्रिल २०२० पासून एकदाही वीजबिल न भरणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्व वर्गवारीतील १४ लाख २९ हजार ८११ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. त्यासाठी महावितरणकडून पथके स्थापन करण्यात आली आहेत.

– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

थकबाकीदाराचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई पुढील तीन आठवड्यात करण्यात येणार आहे, असे महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी सांगितले. महावितरणच्या आर्थिक संकटाचा विचार करून वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरित भरणा करावा. आवश्यकता असल्यास हप्त्यांची देखील सोय केलेली आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. वारंवार संपर्क साधूनदेखील ग्राहकांनी भरणा केलेला नाही.

पुण्याला देशातील सर्वाधिक पर्यावरणपूरक शहर बनवणार: देवेंद्र फडणवीस

त्यामुळे नाइलाजाने पुढील तीन आठवड्यांत या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे नाळे यांनी सांगितले. 
पश्चिम महाराष्ट्रात गेल्या १० महिन्यांमध्ये एकदाही वीजबिल न भरणाऱ्या घरगुती ग्राहकांची संख्या सर्वाधिक १२ लाख ६८ हजार ४८७ असून त्यांच्याकडे ८५६ कोटी ८१ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर १ लाख ३८ हजार ८७० वाणिज्यिक ग्राहकांकडे २६४ कोटी ३२ लाख आणि २२ हजार ४५४ औद्योगिक ग्राहकांकडे १२६ कोटी ३५ लाखांची थकबाकी आहे.

राज्यात सरकारचं हम करेसो कायदा; चंद्रकांत पाटलांची महाविकास आघाडीवर टीका

सद्यःस्थितीत थकबाकी
१०३२.८० कोटी – पुणे
१४०.३६ कोटी – सातारा
२५९.१२ कोटी – सोलापूर
१९२.५४ कोटी – सांगली
३३७.४३ कोटी – कोल्हापूर
पैकी १२४७ कोटी ४९ लाख रुपयांची थकबाकी असणाऱ्या १४ लाख २९ हजार ८११ वीजग्राहकांनी १ एप्रिल २०२० पासून एकाही महिन्याचे वीजबिल भरलेले नाही.

अविनाश भोसलेंच्या मुलाला ईडीने घेतले ताब्यात; मुंबईत चौकशी सुरु

Edited By – Prashant Patil

Leave a Reply

Your email address will not be published.