ब्रेकिंग ! राज्यात कोरोनाचा उद्रेक; शुक्रवारी सापडले पाच हजार 24 रुग्ण तर 175 जणांचा मृत्यू 

सोलापूर : राज्यात शुक्रवारी (ता. 26) दोन हजार 363 रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची आनंददायी बाब असतानाच आज रुग्णांची उच्चांकी भर पडल्याने चिंता वाढली आहे. पाच हजार 24 रुग्ण एका दिवसांत सापडण्याची ही पहिलीच वेळ असून त्यापैकी 175 जणांचा मृत्यू झाला आहे. 

राज्यात आतापर्यंत एक लाख 52 हजार 765 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 79 हजार 815 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, राज्यातील मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत सात हजार 106 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. राज्यातील विविध दवाखान्यांमध्ये सद्यस्थितीत 65 हजार 829 रुग्ण उपचार घेत आहेत. शुक्रवारी झालेल्या मृत्यूपैकी 91 मृत्यू हे मागील 48 तासातील असून 84 मृत्यू हे पूर्वीच्या कालावधीतील आहेत. 

शुक्रवारी या ठिकाणी झाली मृत्यूची नोंद 
मुंबई : 73 
नाशिक : 3 
ठाणे : 2 
उल्हासनगर : 1 
मीरा भाईंदर : 1 
पुणे : 1 
नंदूरबार : 1 
औरंगाबाद : 1 
उर्वरित 84 मृत्यू : पूर्वीच्या आकडेवारीत समाविष्ट 

आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णांची नोंद 
राज्य अनलॉक केल्यानंतर कोरोना या विषाणूची साखळी खंडीत करण्याची जबाबदारी नागरिकांवर सोपविण्यात आली. मात्र, रस्त्यांवर असो की बाजारपेठांमध्ये वाहनांची वर्दळ व नागरिकांची गर्दी वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात शुक्रवारी (ता. 26) सर्वाधिक पाच हजार 24 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यापैकी तब्बल 175 जणांचा मृत्यू झाल्याचे राज्याच्या रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

Web Title: Five thousand 24 patients were found on Friday

Leave a Reply

Your email address will not be published.