ब्रेकिंग ! सोलापुरातील ‘त्या’ 21 वर्षांच्या आतील दोन महिलांचा ‘यामुळे’ झाला मृत्यू 

सोलापूर : आतापर्यंत राज्यातील तीन लाख कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी साडेअकरा हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, कोरोना होण्यापूर्वी असलेल्या गंभीर आजार असलेले रुग्ण कोरोनाचे सर्वाधिक बळी ठरले आहेत. त्यामध्ये सर्रासपणे 60 वर्षांवरील व्यक्‍ती अधिक आहेत. मात्र, सोलापूर शहरात एका 20 वर्षीय व 21 वर्षीय नवविवाहित महिलांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

सोलापूर शहरातील रुग्णसंख्या साडेतीन हजारांवर गेली असून मृतांची संख्या 318 झाली आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्यांमध्ये किमान 40 वर्षांवरील व्यक्‍तींचा समावेश होता. मात्र, बाळे परिसरातील एका 20 वर्षीय महिलेचा आणि नई जिदंगी परिसरातील विजयालक्ष्मी नगरातील 21 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. बाळे परिसरातील महिला पतीसह रहात होती. त्या महिलेचा पती भाजी विक्रेता होता. त्या महिलेला अस्वस्थ वाटू लागल्याने श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर ती महिला उपचारासाठी मार्कंडेय सरकारी रुग्णालयात दाखल झाली. काही दिवसांनी पुन्हा सर्वोपचार रुग्णालयात आली. मात्र, त्या महिलेची शुगर तब्बल 428 झाली होती. त्यामुळे उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला आणि त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली.

वडिलांना भेटण्यासाठी आलेल्या महिलेचाही मृत्यू 
विवाहानंतर मुंबईला सासरी गेलेली मुलगी लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर वडिलांना भेटण्याच्या निमित्ताने सोलापुरात आली. नई जिंदगी परिसरातील विजयालक्ष्मी नगरात त्या महिलेचे माहेर आहे. त्या महिलेला कोणताही पूर्वीचा आजार नव्हता. सोलापुरात आल्यानंतर त्यांच्या पोटात दुखू लागले. त्यानंतर नागरी आरोग्य केंद्रात तपासणी केल्यानंतर त्यांनी उपचार घेण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यांनी तो सल्ला गांभीर्याने न घेता अंगावर काढला. काही दिवसांनी त्रास होऊ लागल्याने दवाखान्यात दाखल झाल्या, मात्र तोवर आतड्याला सूज आली होती. डॉक्‍टरांनी सोनोग्राफी केल्यानंतर त्यांना आतड्याचा कर्करोग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांची कोविड-19 टेस्ट पॉझिटिव्ह आली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

Web Title: Two women under the age of 21 died in Solapur city

<!–

–>

Leave a Reply

Your email address will not be published.