ब्रेकींग! उद्यापासून नववी, दहावी अन् बारावीच्या विद्यार्थ्यांना व्हाट्सअपद्वारे शिक्षणाचे धडे

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षित राहावे, या हेतूने केंद्र सरकारने दूरदर्शन व आकाशवाणीच्या ब्रॉडबँड सेवेस परवानगी द्यावी. काही चॅनेल उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांसह शालेय शिक्षण विभागाने केली. मात्र, मान्यता मिळाली नसल्याने तुर्तास नववी, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना उद्यापासून (15 जून) व्हाट्सअपद्वारे शिक्षणाचे धडे दिले जातील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राज्यात पहिली ते बारावीपर्यंतचे सुमारे दोन कोटी मुले आहेत. त्यांना शिक्षणाची गोडी रहावी, शिक्षणाच्या प्रवाहात ते कायम राहावेत, या हेतूने त्यांना ऑनलाइन, ऑफलाइनद्वारे शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. त्यासंबंधीचा ठोस आराखडा शालेय शिक्षण विभागाने तयार केला आहे. राज्यातील प्रत्येक महापालिका परिसरातील शाळांसाठीही स्वतंत्र आराखडे तयार केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने स्वतंत्र ॲकॅडमीक कार्यक्रम कॅलेंडर तयार केले आहे. मात्र, त्यासाठी केंद्र सरकारकडून दूरदर्शन व आकाशवाणीचे ब्रॉडबँड कनेक्शन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तत्पूर्वी, राज्यातील 95 टक्के विद्यार्थ्यांना पर्यंत पुस्तके पोहोच केले आहेत केंद्राकडून परवानगी मिळेपर्यंत पहिली ते सातवी किंवा आठवीपासूनच या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांमार्फत अथवा पालकांकडून सोय अध्ययन करावे लागेल, असेही शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या. उद्यापासून (ता. 15) राज्यातील कोणतीही शाळा सुरु होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतरही केंद्र सरकारचे तोंडावर बोट
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, कोरोनाच्या वैश्‍विक संकटामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी खबरदारी म्हणून 15 जूनपासून राज्यातील एकही शाळा सुरु होणार नाही. मात्र, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून त्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार कडे शालेय शिक्षण विभागासह मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे दूरदर्शन व आकाशवाणी चे ब्रॉडबँड कनेक्शन मिळावे अशी मागणी केली आहे. परंतु, केंद्र सरकारने अद्यापही त्यासाठी परवानगी दिलेली नाही. ती परवानगी मिळाली की, देशभर दूरदर्शन व आकाशवाणीवरून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जातील.

शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या…

  • – राज्यातील 95 टक्के विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली आहेत पुस्तके
  • – दूरदर्शन व आकाशवाणीचे ब्रॉडबँड कनेक्शन उपलब्ध झाल्यास दोन कोटी विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइनच्या माध्यमातून पोहोचण्याचे शालेय शिक्षण विभागाचे उद्दिष्टे
  • – 15 जूनपासून नववी, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या विषय शिक्षकांद्वारे व्हाट्सअपच्या माध्यमातून दिले जाणारे शिक्षणाचे धडे
  • – ऑनलाईन व ऑफलाईन टीचिंग चे अकॅडमिक कॅलेंडर तयार; मात्र केंद्र सरकारकडून सहकार्याची अपेक्षा
  • – खाजगी शाळांनी लहान मुलांवर ऑनलाइन शिक्षणाचा भडीमार करू नये; पालकांच्या तक्रारी आल्यास केले जाणार कारवाई
  • – शाळा सुरू करण्याचा अधिकार कोरणार संबंधी स्थापित ग्राम सुरक्षा दल व शाळा व्यवस्थापन समितीला असेल

Leave a Reply

Your email address will not be published.