भाजपाला नुकसान पोहचेल असा निर्णय एकनाथ खडसे घेणार नाहीत : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याबद्दल अनेक वेळा अशा अफवा उठल्या आहेत. पण भारतीय जनता पार्टीला कुठलंही नुकसान पोहचेल असा निर्णय नाथाभाऊ खडसे घेणार नाहीत, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला आहे. एकनाथ खडसे हे आमचे जुने-जाणते आणि ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे नाथाभाऊ असा कोणताही निर्णय घेणार नाहीत ज्यामुळे पक्षाला नुकसान पोहचेल.

उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा मोठा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या नावाची जोरदार चर्चा राज्यात सुरू झाली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची खलबत देखील सुरू झाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागलेले भाजपचे मोठे नेते हे एकनाथ खडसे आहेत का अशी जोरदार चर्चा सुरू झालीय.

उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?

भाजपमध्ये आपल्याला सातत्यानं डावललं जात असल्याची एकनाथ खडसे यांची भावना आहे. त्यातून ते गेल्या अनेक दिवसांपासून अस्वस्थ आहेत. एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी अनेकदा जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवली आहे. मात्र, पक्षाच्या नेत्यांकडून कुठल्याही पद्धतीने विचारणा केली नाही किंवा कारवाई देखील केली नाही. गेल्या काही दिवसांपासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ले चढवत आहेत.

नाथाभाऊ नाही तर कोण नेता?

उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे एकनाथ खडसे हे मोठे नेते आहेत. मात्र चंद्रकांत पाटलांनी नाथाभाऊ असं करणार नाहीत म्हटलं. मग नाथाभाऊ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागले नसतील तर मग भाजपचा आणखी कुठला मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहे हा प्रश्न उभा राहतो.

BJP | NCP | उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा मोठा नेता मनगटावर ‘घड्याळ’ बांधणार?

Leave a Reply

Your email address will not be published.