भारताला “हिंदूस्थान’ बनवण्याचे सामर्थ्य शिवसेनेतच ः संभाजी भिडे 

सांगली ः या देशाला भारत म्हणून नव्हे तर हिंदूस्थान म्हणून जगायचे असेल तर शिवसेना आवश्‍यक आहे. तसे घडवण्याचे सामर्थ्य शिवसेनेतच आहे, असे मत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज येथे व्यक्त केले. 

येथील स्टेशन चौकाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, “”बाळासाहेबांची आकांक्षा होती, देशात शिवसेना पोहचली पाहिजे. ती आकांक्षा पूर्ण करण्याची धडपड हयात असलेल्या लोकांनी करावी. चौकाचे नामकरण झाले, पण कामाचे काय? आज सांगली गावात शिवसेनेच्या किमान दोनशे-अडीचशे शाखा असायला हव्या होत्या. तसे झाले नाही. ते दुःख आहे. आपण त्यासाठी कार्यान्वित झाले पाहिजे. अतिशय तडफेने काम करूया, खरे नामकरण ते आहे. हिंदूत्वाचा प्रवाह अखंड चालू राहिल, यासाठी धडपड ठेवली पाहिजे. अखंड देश या प्रवाहात आणून देशाच्या नोटेवर छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा छापण्याची ताकद असलेला देश घडवायचा आहे. ते काम शिवसेनेच्या कार्यातूनच होण्याची शक्‍यता आहे, असे माझे स्वतःचे मत आहे.

या देशाला शिवसेना आवश्‍यक आहे. माणसाला जगण्यासाठी अन्न, पाणी, हवा आणि सूर्यप्रकाश आवश्‍यक आहे, तितकीच या देशाला हिंदूस्थान म्हणून जगायचे असेल, भारत म्हणून नव्हे तर तर शिवसेना आवश्‍यक आहे. त्यासाठी आपण कामावर तुटून पडूया. एका चौकाचे नाव देऊन थांबून चालणार नाही. माझे अंतकरण सांगतेय, माझे हे राजकीय नव्हे तर हे राष्ट्रीय मत आहे.” 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *