मद्यविक्रीतून खर्चही निघेना, दुकानदार शटर बंद करण्याच्या मनस्थितीत; कोठे ते वाचा
मुंबई – लॉकडाउनमुळे मद्यविक्रीच्या व्यवसायाचेही आर्थिक गणित बिघडले असून ऑनलाइन विक्रीचा पर्याय अव्यवहार्य असल्याची तक्रार बहुतांश मद्यविक्रेत्यांनी केली आहे. नुकसानामुळे मुंबईतील २० टक्के विक्रेते दुकानाचे शटर कायमचे बंद करुन परवाना विकण्याच्या मनस्थितीत असल्याचे सांगण्यात येत आहे.
– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मार्चमध्ये लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर मद्यविक्रीला बंदी होती. मद्यविक्रीला सरकारने ४ मेपासून काही प्रमाणात मंजुरी दिली. त्यातही रेड झोन, प्रतिबंधित क्षेत्रांची आडकाठी होती. त्यानंतर दुकानापुढे झालेल्या गर्दीमुळे १५ मेपासून ऑनलाइन विक्री, घरपोच सेवा असे पर्याय अंमलात आणले. मात्र ऑनलाइनच्या माध्यमातून पुरेशी विक्री होत नसल्याचे मद्यविक्रेत्यांचे म्हणणे आहे.
कोट्यवधींचा परवाना
खर्च निघत नसल्याने मुंबईच्या ४७५ पैकी १०० मद्यविक्रेते परवानाच विकण्या मनस्थितीत आहेत. मद्यविक्रीचा परवाना दोन कोटी ते पाच कोटीपर्यंत विकला जातो. त्यामुळे काही व्यावसायिकांनी तो विक्रीस काढल्याचे सांगितले.
अनेक मद्य विक्रेत्यांनी परवाने भाडेतत्तावर घेतले आहेत. त्यामुळे महिन्याकाठी काही लाख रुपये द्यावेच लागतात. अशात मद्याचे दुकान चालवणे कठण असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
Edited By – Prashant Patil