मध्य महाराष्ट्रात पाऊस जोर धरणार

पुणे – विश्रांती घेतलेला पाऊस राज्यात पुन्हा जोर धरेल. त्यासाठी पोषक हवामान तयार होत आहे. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने बुधवारी वर्तविला.
विदर्भ, मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.राज्यात मंगळवारी हलका ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली.पश्चिम किनारपट्टीला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा, गुजरात आणि परिसरावर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थितीमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडण्याचा अंदाज आहे. कोकणात गुरुवारी (ता.२) आणि शुक्रवारी (ता.३) कोकणासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
शिवाजीनगरला १ ते ३० जून दरम्यान २२१.७ मि.मी. पावसाची नोंद झाली. पाषाणला १६० लोहगाव येथे २८४ मि.मी. पाऊस पडला.
पुण्यातील घाट भागात मुसळधार
शहर परिसरातील घाट भागात तुरळक ठिकाणी पुढील चार दिवस जोरदार पाऊस पडेल, असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.शहरातही पुढील चोवीस तासांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडतील.त्यामुळे वाढलेला उन्हाचा चटका कमी होईल. सध्या कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा जास्त नोंदला जात आहे. तो पुढील तीन ते चार दिवसांमध्ये २८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल, असे सांगण्यात आले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा