मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाची संततधार

पुणे – मॉन्सूनने देश व्यापल्यानंतर राज्यातही पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार, तर कोकण, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. नद्या, नाले वाहू लागले असून, धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे.   

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील जवळपास सर्व भागात हलका ते जोरदार पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील तीन व हिंगोली जिल्ह्यातील एका मंडळात अतिवृष्टी झाली. काही दिवसाच्या विश्रांतीनंतर आता मराठवाड्यात पावसाचा जोर वाढू लागला आहे. औरंगाबाद, जालना जिल्ह्याच्या काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात हलका ते जोरदार पाऊस झाला. नगर जिल्ह्याच्या अनेक भागात गेल्या चार दिवसांपासून पाऊस पडत आहे. 

जोरदार पावसाची शक्यता
राज्यात पावसाला सुरुवात झाली असून, आज (ता. २९) तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे. मॉन्सूनचा आस असला कमी दाबाचा पट्टा (मॉन्सून ट्रफ) पश्‍चिमेला पंजाबापासून पूर्वेकडे हिमालय पर्वताच्या पायथ्यापर्यंत विस्तारला आहे. यातच बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बाष्प पुरवठा झाल्याने मध्य आणि उत्तर भारतात पावसाचा जोर वाढणार आहे. दक्षिण कोकण आणि पश्‍चिम विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published.