महाराष्ट्रातील हे सात जिल्हे अजूनही तहानलेलेच; कोणते ते पहा
पुणे – अर्धा पावसाळी हंगाम संपत आला असला तरीही राज्यातील सहा जिल्हे अद्यापही कोरडेच आहेत. तेथे सरासरी इतकाही पाऊस झालेला नाही. दुष्काळी भाग अशी ओळख असलेल्या मराठवाड्यात मात्र यंदा पावसाच्या दमदार सरी पडल्या. राज्यात सर्वाधिक पावसाची टक्केवारी नगर जिल्ह्यात असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.
– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
राज्यात गेल्या चार दिवसांपासून कोकणासह, मराठवाडा आणि विदर्भातील बहुसंख्य जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. राज्यात १ जून ते ६ ऑगस्टदरम्यान सरासरीच्या तुलनेत सहा टक्के पावसाची नोंद झाली. यंदा आतापर्यंत ६५७.५ मिलिमीटर पाऊस पडला आहे.
मध्य महाराष्ट्रातील सातारा, उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार आणि विदर्भातील अकोला, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या सात जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत ५९ ते २० टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे हे जिल्हे अद्यापही तहानलेलेच आहेत.
सध्या दक्षिण गुजरातच्या भागात वाऱ्याची चक्राकार स्थिती आहे. समुद्रसपाटीपासून उंचीवर वारे वाहत आहेत. तसेच बंगालच्या उपसागर, ओडिशा, पश्चिम बंगालमधील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
Edited By – Prashant Patil