मी जन्मानं आणि कर्मानं हिंदू; उर्मिला यांनी कंगनालाही लगावला टोला

शिवसेना ज्वाइन करने के बाद बोलीं उर्मिला मातोंडकर, कंगना को महत्व देने की जरूरत नहीं; हिदुत्ववादी पार्टी में जाने पर भी दिया जवाब काँग्रेसची साथ सोडून राजकारणातून बाहेर पडलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश करुन आपली दुसरी राजकीय इनिंगला सुरुवात केलीय. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे नेतृत्व करताना एक वर्षांत केलेल्या कामगिरीमुळे शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे उर्मिला मातोंडकर यांनी म्हटले आहे. 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती.  

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उर्मिला मातोंडकर यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. काँग्रेस पक्ष सोडून 14 महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मी अवघ्या 14 दिवसानंतर शिवसेनेत दाखल झालेली नाही, असा टोला उर्मिला मातोंडकर यांनी टीकाकारांना लगावला. जे लोक एक पक्ष सोडून लगेच दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात, असे म्हणत त्यांनी इतर पक्षातून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांनाही टोला लगावला.  

मला ‘पीपल मेड राजकारणी’ व्हायचंय, मीडिया मेड नव्हे’ ; उर्मिला यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

महा विकास आघाडी सरकारवर कौतुकाचा वर्षाव करताना उर्मिला यांनी राज्य सरकारच्या कामगिरीचे गोडवे गायले. ठाकरे सरकारला कोरोना महामारीपूर्वी केवळ तीन महिने मिळाले. गरज असल्यास ते कठोर पावलेही उचलताना पाहायला मिळाले, असा उल्लेख उर्मिला यांनी केला.  स्वत:ला ‘सेक्युलर’ म्हणवून घेणाऱ्या उर्मिला यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर हिंदुत्वावरही भाष्य केले. मी हिंदू धर्माच्या खूप जवळ राहिले. पण कधी हिंदुत्ववादाचा गवगवा केला नाही. दुसऱ्या धर्माचा तिरस्कार करणे म्हणजे हिंदुत्व नाही. मी जन्म आणि कर्माने हिंदू आहे. मी धर्माचा अभ्यास केलाय. या विषयावर खूप काही बोलू शकते पण मी तसे कधीच केले नाही, असेही उर्मिला यांनी म्हटले आहे.  

 शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा तो फोन कॉल ठरला महत्त्वाचा

बॉलिवूड क्षेत्रातील लोकप्रिय राहिलेल्या मातोंडकर यांना कंगनाच्या वादग्रस्त भूमिकेविषयी देखील प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्या म्हणाल्या की,  कंगनासंदर्भात आपण खूप काही ऐकले आहे. तिला अधिक महत्त्व देण्याची गरज नाही. प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. यापूर्वीही कंगनासंदर्भात एकही प्रतिक्रिया दिलेली नाही, हे देखील उर्मिला मातोंडकर यांनी आवर्जून सांगितले.  

Leave a Reply

Your email address will not be published.