मृत्यूदर कमी करणे हेच उद्दिष्ट – टोपे

मुंबई – ‘महाराष्ट्रात सध्या कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये ८० टक्के रुग्ण लक्षणविरहीत आहेत; तर १५ टक्के मध्यम स्वरूपाचे आणि पाच टक्के गंभीर स्वरूपाचे रुग्ण आहेत. राज्याचा मृत्यूदर ३.३ टक्के असून तो कमी करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारपुढे आहे,’’ अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 

– ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

– पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील ‘कोरोनाशी दोन हात’ या मुलाखतीत टोपे बोलत होते. सोमवारी (ता.७) सप्टेंबरपर्यंत दररोज रात्री ९ वाजता ही मुलाखत सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. टोपे म्हणाले, ‘‘संसर्गजन्य आजारामध्ये प्रतिकारशक्ती हा महत्त्वाचा घटक असून प्रत्येकाने आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवणे गरजेचे आहे. एका कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीला संसर्ग होतो आणि इतरांना होत नाही म्हणजे इतरांची प्रतिकारशक्ती चांगली असते. ज्यांना लक्षणे नाहीत, म्हणजे थोडाफार विषाणू संसर्ग त्यांच्या शरीरामध्ये असेल, परंतु त्या रुग्णाच्या शरीरातील `न्युट्रिलायजिंग अँण्टीबॉडीज’ने त्या विषाणूला मारलेही असेल.

रोहित पवारांच्या नावाने संघटना, कार्यकर्त्यांना म्हणाले, हे अयोग्य

कोरोनाच्या चाचण्यांबाबत.आरोग्यमंत्री म्हणाले…

  • अँटीजेन आणि आरटी-पीसीआर या निदान करणाऱ्या चाचण्या. 
  • अँटीबॉडी चाचणीच्या माध्यमातून संसर्ग केव्हा झाला, होऊन गेला का, की लगतच्या काळात झाला, या बाबी समजतात. 
  • एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आहे, की निगेटिव्ह हे अँटीबॉडी चाचणीतून समजत नाही. 
  • अँटीजेन चाचणीचा अहवाल अर्ध्या तासात मिळतो. 
  • एखाद्या समूहामध्ये एक-दोन व्यक्ती पॉझिटिव्ह झाल्या, तर त्या समूहाची अँटिजेन चाचणी करून आपल्याला संसर्ग रोखण्यासाठी उपयोग होऊ शकतो. 
  • अँटिजेन चाचणी  चाचणी पॉझिटिव्ह आली, तर ती १०० टक्के पॉझिटिव्ह असते.
  • एखाद्या व्यक्तीला लक्षणे असतील आणि अँटिजेन चाचणी निगेटिव्ह असल्यास ‘आरटी-पीसीआर’ करणे बंधनकारक.

Edited By – Prashant Patil

Leave a Reply

Your email address will not be published.