मोठी बातमी ! प्रथम, द्वितीय व ‘अंतिम’ची आगामी परीक्षाही ऑनलाईनच

सोलापूर : कोरोनाच्या संकटामुळे प्रथम व द्वितीय वर्षाची परीक्षा रद्द झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंतिम वर्षाची परीक्षा पार पडली. ऑनलाइन परीक्षेत विद्यार्थ्यांनी घरी बसून पेपर सोडविले, परंतु गुणवत्तेच्या अनुषंगाने आता उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. परदेशात कोरोनाची दुसरी लाट आल्याने त्याची धास्ती सर्वांनीच घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर जानेवारीत होणाऱ्या प्रथम सत्राच्या परीक्षा ऑनलाईनच घेण्याचे नियोजन विद्यापीठांनी सुरु केले आहे. निकालात पारदर्शकता राहावी म्हणून आगामी परीक्षा ऑनलाइन घेताना प्रॉक्‍टरिंग (विद्यार्थ्यांच्या प्रत्येक हालचालींवर राहणार कॅमेऱ्याची नजर) प्रणालीचा वापर केला जाईल, असेही पुणे विद्यापीठासह अन्य विद्यापीठांकडून सांगण्यात आले.

ठळक बाबी…

  • कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची धास्ती; शाळा, महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय नाहीच
  • जानेवारीत होणार प्रथम सत्र परीक्षा; सोशल डिस्टन्सिंग ठेवून महाविद्यालयांत परीक्षा अशक्‍यच
  • अंतिम वर्षाची परीक्षा पार पडली; आता प्रथम सत्र परीक्षेचे सुरु झाले नियोजन
  • ऑफलाइन व ऑनलाइन परीक्षा होणार; पारदर्शकतेमुळे आता प्रॉक्‍टरिंगचा केला जाणार वापर
  • ऑनलाइन टिचिंगला सुरवात; तांत्रिक त्रुटींची दुरुस्ती करुन आगामी परीक्षा ऑनलाईनच घेण्याचे नियोजन
  • जानेवारीत होणाऱ्या सत्र परीक्षेवर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री पुढील आठवड्यात साधणार कुलगुरुंशी संवाद

राज्यातील 14 सार्वजनिक विद्यापीठांअंतर्गत साडेपाच हजार महाविद्यालयांमध्ये प्रथम, द्वितीय व अंतिम वर्षासाठी दरवर्षी सुमारे 22 लाखांहून अधिक विद्यार्थी प्रवेश घेतात. सद्यस्थितीत एवढ्या मोठ्या संख्येत असलेल्या विद्यार्थ्यांची महाविद्यालयांमध्ये बोलावून परीक्षा घेणे सुरक्षित नसल्याचेही विद्यापीठांचे म्हणणे आहे. राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार 50 टक्‍के कर्मचाऱ्यांना विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये हजर राहणे सक्‍तीचे केले आहे. त्यांनी त्याठिकाणाहून ऑनलाइन टिचिंग करावे, असेही म्हटले आहे. त्यानुसार कार्यवाही सुरु झाली, परंतु ऑनलाइन शिक्षणात सहभागी न होणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय, ऑनलाइन परीक्षा घेतल्यानंतर प्रात्यक्षिक परीक्षेचे काय, ऑनलाइन परीक्षा न देणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घ्यायची, अशा अडचणींवर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत पुढील आठवड्यात राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या कुलगुरुंशी चर्चा करणार आहेत.

ऑनलाइन परीक्षेचे नियोजन पण अडचणींबाबत हवे मार्गदर्शन
अंतिम वर्षातील 90 ते 96 टक्‍के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली. नंदूरबार जिल्ह्यातील काही विद्यार्थी वगळता सर्वच विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पध्दतीने परीक्षा दिली. किरकोळ अडचणींशिवाय सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडली. आता कोरोनाची दुसरी लाट आणि 30 नोव्हेंबरपर्यंत वाढलेला लॉकडाउन, या पार्श्‍वभूमीवर आगामी सत्र परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय विचाराधिन आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह अन्य प्रश्‍नांची उत्तरे उच्च व तंत्र शिक्षण विभाग व विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अपेक्षित आहेत. 
बी. पी. पाटील, परीक्षा नियंत्रक, जळगाव विद्यापीठ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

Web Title: The first, second and final years new students exams will also be online

<!–

–>

Leave a Reply

Your email address will not be published.