मोठी बातमी ! राज्यातील 36 हजार शाळा सुरु होणार; प्रतिबंधित क्षेत्रातील शाळा राहणार बंदच

सोलापूर : राज्यात स्टेट बोर्ड, सीबीएसई, आसीएसई, इंन्टरनॅशनल बोर्ड, सीबीएसई व स्टेट बोर्ड आणि इतर अशा एकूण एक लाख 10 हजार 229 शाळा आहेत. त्यात नववी ते बारावीपर्यंतच्या 35 हजार 957 शाळा असून या शाळांमध्ये सुमारे 59 लाख विद्यार्थी प्रवेशित आहेत. राज्य सरकारच्या निर्णयानुसार या विद्यार्थ्यांना आता एक दिवसाआड चार तासांत विज्ञान, गणित, इंग्रजी विषयांचे धडे दिले जाणार आहेत. मात्र, प्रतिबंधित क्षेत्रातील शाळा तुर्तास बंदच राहणार आहेत.

राज्य सरकारकडून दिल्या जातील मार्गदर्शक सूचना
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकारकडून शाळा सुरु करण्यापूर्वी ठोस आराखडा तयार केला जात आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास प्राधान्य दिले जाणार असून सरकारच्या निर्देशानुसार नियमांचे तंतोतंत पालन करुन नववी ते बारावीपर्यंतच्या सुमारे 35 हजार शाळा सुरु होतील.
– दिनकर पाटील, संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, पुणे

राज्यात 96 हजारांहून अधिक ऍक्‍टिव्ह रुग्ण असून सर्वच जिल्हे अद्याप रेड झोनमध्येच आहेत. आतापर्यंत 45 हजार 300 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 31 वर्षांवरील रुग्णांचाच सर्वाधिक समावेश आहे. तरीही कमी जोखीम असलेल्या नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग भरविण्याचा निर्णय झाला. अनलॉकनंतर आता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रशिक्षण, अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसह दहावी- बारावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची नोव्हेंबरअखेर परीक्षा उरकण्याचे नियोजन झाले आहे. दुसरीकडे मार्चपासून बंद असलेल्या शाळांचे कुलूप आता उघडण्याचाही निर्णय झाला. परंतु, प्रतिबंधित भागातील शाळांबाबतचा निर्णय संबंधित शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविण्यात आला आहे. तर दुसरीकडे शिक्षकांच्या ‘आरटीपीसीआर’ टेस्टचा खर्च आणि शाळांमधील थर्मल स्क्रिनिंग व ऑक्‍सिमीटर मशिनचा खर्च कोणी करायचा हा नवा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शाळांनी सरकारकडे बोट दाखविले असून आता त्यावर काय निर्णय होणार, याची उत्सुकता आहे.

राज्यातील शाळांची स्थिती 
शाळांचा प्रकार                         शाळांची संख्या    विद्यार्थी 

 • प्राथमिक (1 ते 5)             52,094             34,95,18 
 • उच्च प्राथमिक (1 ते 8)      29,915             60,44,197 
 • उच्च माध्यमिक (1 ते 12)   6,467              54,88,001 
 • उच्च प्राथमिक (6 ते 8)      127                  6,510 
 • उच्च माध्यमिक (6 ते 12)   1,235              4,69,217 
 • माध्यमिक (1 ते 10)          10,527             45,26,673 
 • माध्यमिक (6 ते 10)           6,126              9,03,736 
 • माध्यमिक (9 व 10)           981                 9,8841 
 • उच्च माध्यमिक (9 ते 12)    162                41,659 
 • उच्च माध्यमिक (11 व 12)  2,595             10,99,873
 • एकूण                             1,10,229         2,21,74,62

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *